
Maharashtra Weather News : बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण होणाऱ्या ‘दितवाह’ चक्रीवादळामुळं मागील 24 तासांपासून देशाच्या बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळालं असतानाच तिथं उत्तरेकडील राज्यांमध्ये मात्र थंडीचा कडाका वाढला. पर्वतीय भागांमध्ये पुन्हा एकदा तापमानात घट झाल्या कारणानं बहुतांश भागांमध्ये हिमवर्षावास सुरुवात झाली आहे. परिणामी उत्तरेकडून वाहणाऱ्या शीतलहरींनी पुन्हा एकदा देशाचा बहुतांश भाग व्यापला असून, महाराष्ट्रावरही या शीतलहरींचा परिणाम दिसून येत आहे.
चक्रीवादळाच्या स्थितीदरम्यान थंडीचा कडाका वाढला असून ढगाळ वातावरणावर वरचढसुद्धा ठरताना दिसत आहे. ज्यामुळं महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा इथं तापमानात काही अंशांची घट अपेक्षित असून इथं थंडीचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, विदर्भात मात्र आकाश अंशत: ढगाळ राहणार असून, पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात पहाटेचा गारठा वाढला असून, दिवस मावळतीला गेल्यानंतर तापमानात घट नोंदवली जात आहे, ज्यामुळं पुन्हा एकदा किमान तापमानाच्या आकड्यानं 7 अंशांचा टप्पा गाठवला आहे.
Cold wave conditions very likely to prevail at a few places in districts of North Madhya Maharashtra.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/o77odvfHCL
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) November 30, 2025
पुणे, सातारा, कोल्हापुरातील घाट क्षेत्रामध्ये तापमानात घट होत असून, थंडीचा हा कडाका येत्या दिवसांत आणखी वाढणार असल्याचा इशारा जारी करण्यात आला आहे. पुढील 24 तासांमध्ये राज्यात प्रामुख्यानं मुंबई शहर आणि उपनगरात थंडी वाढेल, तर जळगाव, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, जालना, परभणी या भागांमध्ये थंडीच्या लाटेसदृश्य पावसाची हजेरी असेल.
वादळाचे स्पष्ट संकेत…
बंगालच्या उपसागरामध्ये दक्षिण पश्चिमेस चक्रीवादळी वारे काहीसे कमकुवत पडले असले तरीही ते कमी दाबाच्या तीव्र पट्ट्यामध्ये रुपांतरित झाले आहेत. 1 डिसेंबरला हे वारे उत्तर तामिळनाडू, पुद्दुचेरीपासून 20 किमी दूर असेल. ज्यामुळं प्रामुख्यानं दक्षिण भारतातील किनारपट्टी भागात नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन यंत्रणांनी केलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



