digital products downloads

थोडक्यात बचावला मोठा नेता! अजित पवार म्हणालेले विमानाने ‘बरोबरच जाऊ’, पण..; स्वत: सांगितला घटनाक्रम

थोडक्यात बचावला मोठा नेता! अजित पवार म्हणालेले विमानाने ‘बरोबरच जाऊ’, पण..; स्वत: सांगितला घटनाक्रम

Ajit Pawar Death In Plane Crash This Leader Was Suppose To Travel With Deputy CM: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाचा 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ लॅण्डींगदरम्यान झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. अजित पवारांसोबतच या अपघातामध्ये एकूण सहा जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये दोन वैमानिक आणि फ्लाइट अटेडंट आणि अजित पवारांच्या खासगी अंगरक्षाचा समावेश आहे. अजित पवारांच्या निधनामुळे संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला आहे. असं असतानाच आता अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानात राज्यातील आणखीन एक मोठा नेता असता अशी माहिती समोर आली आहे. सुदैवाने वेळेत न पोहचल्याने या नेत्याला या विमानात बसता आलं नाही आणि त्याचा जीव वाचला. ही माहिती या नेत्यानेच दिली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

तो बडा नेता कोण?

28 तारखेला सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी मुंबईमधील कलीना विमानतळावरुन उड्डाण घेतलेल्या अजित पवारांच्या विमानामध्ये त्यांच्यासोबत राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकरही प्रवास करणार होते. मात्र त्यांना वेळेत पोहचता आलं नाही आणि विमान सुटलं. हेच विमान अर्ध्या तासाने म्हणजेच 8 वाजून 46 मिनिटांनी बारामती विमानतळापासून दोन किलोमीटर अंतरावर टेबल टॉप धावपट्टीजवळच्या खड्ड्यात कोसळलं. विमान कोसळल्यानंतर मोठे स्फोट झाले आणि मदतीसाठी धावलेल्या स्थानिक गावकऱ्यांनाही काही करता आलं नाही. यामध्ये अजित पवारांसहीत एकूण सहा जणांचा मृत्यू झाला. मात्र या विमानातून आपणही प्रवास करणार होतो अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.  नेमकं नियोजन काय होतं याबद्दल जानकर यांनी सविस्तरपणे सांगितलं आहे.

कसं होतं प्रवासाचं नियोजन?

“अजितदादांचा मला 24, 25 आणि 26 ला सतत फोन येत होता. साताऱ्यात दादांची राष्ट्रवादी, पवारांची राष्ट्रवादी आणि माझ्या राष्ट्रीय समाज पक्षाची युती झालेली आहे. आपण साताऱ्याच्या सभेला बरोबरच जाऊ असं दादा मला म्हणाले होते. बारामतीला मला तुमच्या एका नगरसेवकाची मदत लागणार आहे. राष्ट्रीय समाज पक्ष आणि राष्ट्रवादीची युती करायला तयार आहोत असं दादा म्हणाले. महाराष्ट्र नशीब खराब की काय म्हणायचं की काय कळेना. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख, आर. आर. पाटील आणि आता अजित पवारांच्या जाण्याने भारताचं नुकसान झालं आहे. आमदार, मंत्री, खासदार होणं सोपं असतं. नेता बनणं अवघड असतं. राज्याचा आणि देशाचा विकास करणार हा माणूस होता. आमची चांगली मैत्री होती. ते मला कायम सल्ला द्यायचे,” असं जानकरांनी प्रवासाचं नियोजन कसं होतं याबद्दल अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देताना म्हटलं.

…म्हणून पकडलं नाही विमान

जानकरांना तुमचं विमान कसं सुटलं? याबद्दल विचारलं असता त्यांनी, “मला बेळगाववरुन यायला 3 वाजले पहाटेचे, त्यामुळे मी झोपलो होतो,” असं उत्तर दिलं. म्हणजेच झोप लागल्याने वेळेत विमान न पकडू शकल्याने जानकर या विमान अपघातातून बचावले असं त्यांनीच स्पष्ट केलं आहे.  

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp