digital products downloads

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: भूगोलाची परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार; पेपर चोरीच्या घटनेनंतर बोर्डाचे स्पष्टीकरण – Pune News

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी:  भूगोलाची परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार; पेपर चोरीच्या घटनेनंतर बोर्डाचे स्पष्टीकरण – Pune News



सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे दहावीच्या भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिका चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यामुळे उद्याच्या परीक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या घटनेचा अहवाल पुणे बोर्डाने तातडीने मागवला होता, ज्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. भूगोलाचा पेपर फुटण्याची किंवा रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने राज्याच्या शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर, पुणे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने महत्त्वाची घोषणा करत उद्याचा भूगोलाचा पेपर पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. बोर्डाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता शांतपणे परीक्षेची तयारी करावी आणि आत्मविश्वासाने पेपर सोडवावा, असे आवाहन केले आहे. सांगोल्यातील चोरीच्या घटनेमुळे वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, हे आता अधिकृतपणे स्पष्ट झाले आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम होण्याची शिक्षण तज्ञांनची मात्र, बोर्डाने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला असला तरी सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चोरीला गेलेल्या 50 प्रश्नपत्रिकांचे जर कोणी फोटो काढले असतील किंवा त्या झेरॉक्स करून सोशल मीडियावर व्हायरल केल्या असतील, तर त्याची जबाबदारी बोर्ड स्वीकारणार का? प्रश्नपत्रिकांची गोपनीयता धोक्यात आलेली असतानाही परीक्षा रेटून नेण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम होण्याची भीती शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. प्रश्नपत्रिका चोरी प्रकरणी कारवाई सांगोला येथील दहावीच्या प्रश्नपत्रिका चोरीच्या गंभीर प्रकरणाची दखल घेत शिक्षण विभागाने मोठी कारवाई केली आहे. या घटनेत कर्तव्यात कसुरी केल्याचा ठपका ठेवत प्रभारी शिक्षणाधिकारी सुयोग नवले आणि विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक अमोल गायकवाड यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय, सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलिस कर्मचारी आणि होमगार्ड यांच्यावरही प्राप्त अहवालानुसार निलंबनाची कारवाई प्रस्तावित आहे. सोलापूरचे सहाय्यक पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, बोर्डाचे प्रतिनिधी उकिरडे आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या शिस्तभंगविषयक कारवाईवर शिक्कामोर्तब करण्यात आले. या संदर्भातील ही बातमीही वाचा दहावीचा उद्याचा भूगोलाचा पेपर फुटला:सांगोल्यातील परीक्षा केंद्राच्या स्ट्राँगरूममधून तब्बल 50 प्रश्नपत्रिका चोरीला दहावी बोर्डाचा उद्याचा भूगोल विषयाचा पेपर फुटला आहे. या पेपरच्या प्रश्नपत्रिकांचा एक संच आज सांगोला येथील एका परीक्षा केंद्रातील स्ट्राँग रूममधून चोरीला गेला. यामुळे या पेपरच्या गोपनीयतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, हा पेपर रद्द होणार की नवीन प्रश्नपत्रिका संच पुरवले जाणार? याबाबत शिक्षण मंडळाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे बोर्डाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वाचा सविस्तर

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp