
Anil Pawar Arrest: वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार, निलंबित नगररचना उपलसंचालक वाय एस रेड्डी यांच्यासह चौघांना सक्तवसुली संचलनालयाकडून अटक करण्यात आली आहे. वसई विरारमधील अनधिकृत बांधकाम प्रकऱणी ही अटकेची कारवाई करण्यात आली. आरोपींमध्ये माजी नगरसेवक आणि बांधकाम व्यवसायिक सीताराम गुप्ता आणि अरुण गुप्ता यांचाही समावेश आहे. आज सर्व आरोपींनी विशेष पीएलएमए कोर्टात हजर करण्यात आलं. यादरम्यान अनिल पवार यांच्या वकिलाने धक्कादायक दावा केला, ज्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेत अंतर्गत वाद आहेत म्हणून हे घडवलं गेलं असा दावा त्यांनी केला. ईडीकडून दहा दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली.
न्यायाधीश आर बी रोटे यांच्या कोर्टात सुनावणी झाली. ईडीच्या वतीने वकिल कविता पाटील यांनी युक्तिवाद केला. यावेळी त्यांनी गुन्ह्याचं गांभीर्य मोठं असून, साखळी करून हा आर्थिक गुन्हा केला असल्याचं सांगितलं. आर्थिक लाभासाठी अधिकार आणि कायद्याचा दुरुपयोग करण्यात आला. यामध्ये अधिकारी आणि ठेकेदार यांच्या चौकशीत त्यांनी सहकार्य केलं नाही. अनेक जणांचे यात आर्थिक हितसंबंध आहेत असाही दावा केला. तसंच सखोल तपास करण्यासाठी 10 दिवसांची कोठडी आवश्यक असल्याची म्हटलं.
चौघा आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद करताना 10 दिवसांच्या कोठडी मागणीला विरोध केला. तपासात सहकार्य करत असल्याचा दावा वकिलांनी केला. या प्रकरणात कुणी एक व्यक्ती निर्णय किंवा मंजुरी देत नाही. अनेक डिपार्टमेंटकडून आलेल्या फाईल्सवर स्वाक्षरी केली जाते असाही युक्तिवाद केला. ईडीलाला यापूर्वीच आवश्यक ती सर्व कागदपत्रे दिली आहेत. बँक स्टेटमेंट, गुंतवणूक, शेती याची माहिती त्यात आहे असा ईडीच्या ताब्यात असलेल्या आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद केला.
सध्या निवडणुका येत आहेत. काही आमदारांचे हितसंबंध गुंतले आहेत, म्हणून आम्हाला लक्ष केलं जात असल्याचा अनिल पवार यांच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद केला. अनिल पवारांनी अनधिकृत बांधकामांवर केलेल्या कारवाईचा देखील कोर्टात हवाला दिला. अनिल पवार यांची अटक बेकायदेशीर असल्याचा आक्रमक युक्तिवाद वकिलांनी केला.
तपासात सहकार्य करीत असतानाही खोटे आरोप रचून अटक केली असून, ही ईडीची मोडस ऑपरेंडी असल्याचं त्यांनी म्हटलं. अनिल पवार यांच्यावर आरोप केलेल्या एकाही आरोपाचा,प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पुरावा नाही असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला आहे.
इतकंच नाही तर अनिल पवार हे कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांचे भाचेजावई असल्याने त्यांची मुद्दाम बदनामी करण्यात आली. दादा भुसे हे शिंदेसेनेचे नेते आहेत म्हणून जाणीवपूर्वक बदनामी केली. भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत अंतर्गत वाद आहेत म्हणून हे घडवलं गेल असा खळबळजनक दावा वकिलाने केला आहे.
वसई विरारचे माजी पालिका आयुक्त अनिलकुमार पवार आणि इतरांच्या कोठडी संदर्भातली सुनावणी पूर्ण झाली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.