
पुण्यात परशुराम आर्थिक विकास महामंडळ उद्घाटनावरुन महायुतीत नाराजीनाट्य पाहायला मिळालं. महामंडळाच्या इमारतीचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उद्घाटन केलं. अजित पवारांनी 10 मिनिटं आधीच उद्घाटन केल्यानं भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी नाराज झाल्या. मेधा कुलकर्णी यांनी थेट अजित पवारांसमोरच नाराजी व्यक्त केली. यानंतर अजित पवारांवर पुन्हा एकदा उद्घाटन करण्याची वेळ आली.
झालं असं की, परशुराम आर्थिक विकास महामंडळाचं सकाळी 6.30 वाजता उद्घाटन होणार होतं. पण खासदार मेधा कुलकर्णी या विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचण्यापूर्वीच पालकमंत्री अजित पवार यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केलं होतं. आपण पोहोचण्यापूर्वी आणि 10 मिनिटं आधीच अजित पवारांनी उद्घाटन केल्याने मेधा कुलकर्णी यांची थोडी चीडचिड झाली. यानंतर अजित पवार यांनी मला नव्हतं माहिती असं सांगितल्यांवर मेधा कुलकर्णी असं कसं? अशी विचारणाही केली. मेधा कुलकर्णी यांच्या नाराजीनंतर अजित पवारांनी पुन्हा एकदा या इमारतीचं उदघाटन केलं.
दोघांमध्ये नेमकं काय संभाषण झालं?
मेधा कुलकर्णी – दादा साडेसहाच्या आधीच झालं, साडेसहाची वेळ होती पण त्याआधीच झालं
अजित पवार – मला काय माहिती तुम्ही येणार
मेधा कुलकर्णी – मी येणार नाही, परशुराम आर्थिक विकास महामंडळ आहे. कधी नव्हे ते झालंय
आज महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून पुण्यात परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. या महामंडळाला कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही. ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील तरुण, तरुणींना मदतीचा हात देऊन त्यांच्या सर्वांगीण… pic.twitter.com/uqDfDOto5K
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) May 1, 2025
“मी सकाळी साडेसहाचं उद्घाटन असल्याने 6.15 वाजता तिथे पोहोचले होते. पण त्याआधी उद्घाटन झालं. मी 15 मिनिटं आधी पोहोचूनही उद्धाटन कसं काय झालं असं वाटलं. माझी दादांना एकच विनंती आहे की, जी काही वेळ घोषित कराल त्या वेळात आम्ही पोहोचू. पण त्याहीआधी 15-20 मिनिटं आधी उद्घाटन केलं, तर आम्हाला लाभ घेता येणार नाही. त्यामुळे वेळेपूर्वी उद्घाटन करु नका,” असं मेधा कुलकर्णी यांनी सांगितलं.
Pune Medha Kulkarni On Ajit Pawar | परशुराम आर्थिक विकास महामंडळ उद्घाटनावरून महायुतीत नाराजीनाट्यhttps://t.co/3Epll5GTUQ pic.twitter.com/2EAlTbblt8
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 1, 2025
पुढे त्या म्हणाल्या, “आम्ही सगळ्याच कार्यक्रमात जात असतो. समाजाच्या वेगवेगळ्या लोकांसाठी काम करत असतो. येथेही आमचे काही बांधव येणार होते, ते रस्त्यात होते. साडेसहाची वेळ होती, त्याआधी उद्घाटन झाल्याने तेही पोहोचू शकले नाहीत. आणि मी पोहोचूनसुद्धा त्यात सहभागी होता आलं नाही”.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.