digital products downloads

दिवसाला 20 ते 30 हजार अन् महिन्याला 5 ते 8 लाख रुपये कमवणारा मुंबईचा रिक्षावाला; बिझनेस मॉडेल थक्क करणारं

दिवसाला 20 ते 30 हजार अन् महिन्याला 5 ते 8 लाख रुपये कमवणारा मुंबईचा रिक्षावाला; बिझनेस मॉडेल थक्क करणारं

Mumbai Auto Driver Earning Rahul Rupani: मुंबईमधील एक रिक्षावाला महिन्याला पाच ते आठ लाख रुपये कमवतो असं तुम्हाला सांगितल्यास नक्कीच आश्चर्य वाटेल ना? एवढी कमाई तर अनेक आयटी कंपन्यांमधील डायरेक्टर्स, सीए किंवा सीएस अथवा आयआयटीमधून पास झालेल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचीही नसते. बरं आता ही कमाई हा रिक्षावाला कोणत्याही राईड बुकिंग अॅप्लिकेशनवरुन, शेअर मार्केटमधून किंवा रिक्षा चालवून करत नाही तर केवळ एका जागी बसून करतो असं सांगितल्यास तुमचं त्याच्याबद्दलचं कुतूहल नक्कीच वाढेल यात शंका नाही. पण हे खरं आहे. हा रिक्षावाला मुंबईतील नामांकित कॉर्परेट परिसर असलेल्या वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्स म्हणजेच बीकेसी येथे आहे. हा रिक्षावाला काय करतो ते वाचल्यानंतर तुम्ही खऱोखरच त्याच्या डोकॅलिटीला सलाम कराल यात शंका नाही.

बिझनेस मॉडेलची चर्चा

हा रिक्षावाला बीकेसीमधील अमेरिकन काऊन्सिलेटच्या बाहेर उभा असतो. त्याचा बिझनेस मॉडेल अगदी सोपा आहे. तो कोणतंही अॅप्लिकेशन, आर्थिक सहाय्य किंवा इतर कोणतंही तंत्रज्ञान वापरत नाही. काऊन्सिलेटमध्ये येणाऱ्या व्यक्तींचं समान सांभाळण्याचं साधं काम तो करतो. लेन्सकार्टमध्ये प्रोडक्ट लीडर म्हणून काम करणाऱ्या राहुल रुपाणी यांनी स्वत: या रिक्षावाल्याची मदत घेतली होती. त्यानंतर त्यांनी त्यांच्या लिंक्डइनवर या रिक्षावाल्याच्या बिझनेस मॉडेलची स्टोरी सविस्तरपणे पोस्ट केली आहे. अमेरिकी व्हिसासाठी काऊन्सिलेटमध्ये भेट दिलेल्या रुपाणी यांनी त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं आणि हा रिक्षावाला काय काम करतो हे आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

तो रिक्षावाला काय म्हणाला?

“सुरक्षारक्षकांनी मला सांगितलं की मला माझी बॅग काऊन्सिलेटमध्ये नेता येणार नाही. आतमध्ये लॉकर किंवा इतर कोणतीही सोय उपलब्ध नसल्याचं मला सांगण्यात आलं. त्यावेळी काय करावं हे मला कळेना. गोंधळून मी फुटपाथवर उभा असताना एका रिक्षाचालकाने मला अगदी सोपा पर्याय सुचवला. “सर बॅग माझ्याकडे द्या. मी ती सुरक्षित ठेवतो. हे माझं रोजचं काम आहे. मी हजार रुपये घेईन” असं रिक्षाचालक मला म्हणाला,” अशी माहिती रुपाणी यांनी पोस्टमध्ये दिली आहे.

रिक्षा जागेवरुन हालतही नाही

मात्र नंतर रुपाणी यांना हा रिक्षावाला या माध्यमातून बक्कळ कमाई करत असल्याचं समजलं. हा रिक्षावाला रोज अमेरिकी काऊन्सिलेटबाहेर रिक्षा पार्क करतो आणि येथे येणाऱ्यांना जेव्हा सोबत सामान, बॅग आत नेऊ शकत नाही असं सांगितलं जातं तेव्हा तो त्यांच्या मदतीला धावतो. तो प्रत्येक ग्राहकाकडून एक हजार रुपये घेतो. दिवसभरात त्याला असे 20 ते 30 ग्राहक सहज मिळतात. म्हणजेच त्याची दिवसाची कमाई 20 ते 30 हजार रुपये आहेत. म्हणजेच रिक्षा एका जागी उभी करुन हा रिक्षा चालक महिन्याचे पाच ते आठ लाख रुपये कमवतो.

पोलिसांची घेतो मदत

रुपाणी यांनी आपल्या पोस्टमध्ये हा रिक्षावाला स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांची मदत घेत असल्याचं म्हटलं आहे. “त्याला एकाच वेळी रिक्षात 30 बॅग ठेवता येणार नाहीत. त्यामुळे तो स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांची मदत घेतो. या पोलीस अधिकाऱ्यांना लॉकर सुविधा देण्यात आलेली असते. या बॅग तिथेच ठेवल्या जातात. ही कायदेशीर, सुरक्षित आणि जास्त ताप नसलेली पद्धत आहे. रिक्षा हे केवळ माध्यम आहे,” असं रुपाणी यांनी म्हटलं आहे. कोणत्याही तंत्रज्ञानाचा वापर न करता ग्राहकांचा विश्वास संपादन करण्याचं या रिक्षाचालकाचं कौशल्य वाखाणण्याजोगं असल्याचं रुपाणी यांनी नमूद केलं आहे. “तो एमबीए शिकलेला नाही, त्याचं कोणतं स्टार्टअप नाही केवळ त्याच्याकडे तत्काळ उद्भवणाऱ्या समस्येचं सोल्यूशन आहे,” असं रुपाणी यांनी म्हटलं आहे.

अशा गोष्टी पुस्तकात शिकवत नाहीत

“अशा गोष्टींबद्दल उद्योगांसंदर्भातील पुस्तकांमध्ये शिकवलं जात नाही. मात्र याबद्दल आधीच शिकवलं असतं तर बरं झालं असतं असं नक्कीच वाटतं. खाऱ्या उद्योजकांला कायम काही प्रस्ताव मांडण्यासाठी मंचाची आवश्यकता असते असं नाही कल्पना असेल तर तुम्हाला पार्किंग लॉटही पुरेसा आहे,” असं रुपाणी यांनी पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp