digital products downloads

दिव्यांग मुलांना मिळाली हेलिकॉप्टर राईडचा अनुभव: व्हॅलेंटाईन डेनिमित्त OYE फाउंडेशनचा उपक्रम; 35 मुलांनी अनुभवला आकाशाचा आनंद – Pune News

दिव्यांग मुलांना मिळाली हेलिकॉप्टर राईडचा अनुभव:  व्हॅलेंटाईन डेनिमित्त OYE फाउंडेशनचा उपक्रम; 35 मुलांनी अनुभवला आकाशाचा आनंद – Pune News



व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने ‘ओपन युअर आईज (OYE) फाउंडेशन’ आणि ‘महालक्ष्मी एव्हिएशन’ने दिव्यांग मुलांसाठी एक अनोखा उपक्रम राबवला. या उपक्रमांतर्गत ३५ दिव्यांग मुलांना हेलिकॉप्टर राईडचा अविस्मरणीय अनुभव मिळाला. यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे तेज उमटले. ओवायई फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. सिमरन जेठवानी यांच्या पुढाकाराने आणि महालक्ष्मी एव्हिएशनचे नितीन गोते व कॅप्टन नितीन वेल्डे यांच्या सहकार्याने हा उपक्रम साकारण्यात आला. प्रत्येक मुलाला सहा मिनिटांची हेलिकॉप्टर सफर घडवून आणण्यात आली, जो त्यांच्यासाठी एक वेगळा अनुभव ठरला. हेलिकॉप्टर जमिनीवरून आकाशात झेपावताच मुलांनी आनंदाने हात हलवत खाली पाहिले. काहींनी प्रथमच शहराला वरून पाहिल्याने आश्चर्य व्यक्त केले, तर काहींच्या डोळ्यांत उत्साहाश्रू चमकले. “आज आम्हीही उडालो आणि आमची स्वप्नपूर्ती झाली,” असे एका मुलाने हसत सांगितले, ज्यामुळे उपस्थितांचे मन भारावले. डॉ. सिमरन जेठवानी यांनी सांगितले की, “या मुलांना केवळ एक राईड नव्हे, तर आयुष्यभर जपून ठेवतील अशी आठवण द्यायची होती. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आमचा उद्देश सफल झाला. हा उपक्रम केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर संवेदनशीलतेचा संदेश होता. दिव्यांग व्यक्तींना केवळ सहानुभूती नव्हे, तर संधी आणि सन्मान देणे आवश्यक आहे.” नितीन गोते यांनी सांगितले की, डॉ. जेठवानी यांनी दिव्यांग मुलांना हेलिकॉप्टर राईड घडविण्याची विनंती केली होती. सामाजिक भावनेतून आम्ही याला प्रतिसाद दिला आणि ३५ मुलांना हा अविस्मरणीय आनंद देऊ शकलो, याचे समाधान वाटते. समाजात समावेशकतेचा संदेश देणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला असून, भविष्यात आणखी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा संस्थांचा मानस आहे. आकाशातून जमिनीवरील नजराणा खूप सुंदर दिसत होता, झाडे, नदी, गाड्या, माणसे छोटी-छोटी दिसत होती, अशी भावना व्यक्त करत सहभागी मुलांनी आयोजकांचे आभार मानले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp