
महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स…
.
संभाजीनगरात पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण
छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पोलीस, महसूल, क्रिडा अशा विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना मंत्री शिरसाट यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
व्यावसायिक सिलिंडर 17 रुपयांनी स्वस्त, दुधाचे दर वाढले
नवीन महिना म्हणजेच मे आपल्यासोबत अनेक बदल घेऊन आला आहे. आजपासून अमूलचे दूध २ रुपयांनी महाग झाले आहे. तथापि, जर तुम्ही एटीएम फ्री लिमिटनंतर पैसे काढले तर तुम्हाला जास्त शुल्क भरावे लागेल. याशिवाय, आता तुम्ही वेटिंग तिकिटांवर स्लीपर आणि एसी कोचमध्ये प्रवास करू शकणार नाही.
आजपासून, १९ किलोचा व्यावसायिक सिलिंडर १७ रुपयांनी स्वस्त झाला आहे. दिल्लीत त्याची किंमत १४.५० रुपयांनी कमी होऊन १७४७ रुपयांवर आली आहे. पूर्वी ते १७६२ रुपयांना उपलब्ध होते. कोलकातामध्ये ते १७ रुपयांनी कमी किमतीत १८५१.५० रुपयांना उपलब्ध आहे, पूर्वी त्याची किंमत १८६८.५० रुपये होती. सविस्तर वाचा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत
भारताच्या मीडिया आणि मनोरंजन उद्योगाला जागतिक स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी WAVES 2025 चे आयोजन करण्यात आले आहेत. ही अशा प्रकारची पहिलीच शिखर परिषद आहे. पंतप्रधान मोदी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये चार दिवसांच्या परिषदेचे उद्घाटन करतील. पंतप्रधान मोदी सकाळी 10.30 वाजता पोहोचतील. ही परिषद 4 मे पर्यंत सुरू राहील. सविस्तर वाचा
महाराष्ट्र दिन विशेष: महाराष्ट्रासाठी 105 जणांचे हौतात्म्य
संयुक्त महाराष्ट्राचा लढा मुंबईच्या रस्त्यावर लढला गेला. त्यात 105 हुतात्मे झाले. यापैकी तब्बल 85 जण मुंबईतले गिरणी कामगार होते. या कामगारांचे नेतृत्व कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांनी केले. त्यांच्या तडाख्यामुळेच मुंबई महाराष्ट्राला मिळाली. श्रीपाद डांगे यांचे संघटना बांधणीचे असामान्य कौशल्य, घणाघाती भाषणे या दुग्धशर्करा योगाने संयुक्त महाराष्ट्राचा लढा यशस्वी झाला. त्यामुळे कॉम्रेड डांगे संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार ठरतात. या लढ्यात कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांना साथ दिली एस. एम. जोशी, आचार्य अत्रे, चिंतामणराव देशमुख, सेनापती बापट, क्रांतिसिंह नाना पाटील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, बॅ. नाथ पै यांनी.
आज महाराष्ट्र दिन. त्यानिमित्त जाणून घेऊ कॉम्रेड डांगे यांच्या नेतृत्तवाखाली लढलेल्या महाराष्ट्र देशाच्या या अभूतपूर्व लढ्याची गोष्ट. सविस्तर वाचा
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.