
महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स…
.
LIVE NEWS & UPDATES
मोहिनी एकादशीनिमित्त पंढरीत हजारो भाविकांची मांदियाळी
वैशाख शुद्ध मोहिनी एकादशीनिमित्त आज पंढरपुरात हजारो भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
ऑपरेशन सिंदूरमधून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या- शायना एनसी
ऑपरेशन सिंदूरमधून आपल्याला अनेक गोष्टी शिकण्यासारख्या असल्याचा दावा शिवसेना नेत्या शायना एनसी यांनी केला आहे. पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये भारताने केलेल्या हल्ल्यातून आपल्याला या गोष्टी शिकायला मिळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाने अचूक हल्ले केले हे, अत्यंत कौतुकास्पद असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. सविस्तर वाचा
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीने दादरमध्ये पोस्टर्स
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी केंद्रावर हल्ला केला. या हल्ल्यात अनेक दहशतवादी ठार झाले असल्याची माहिती समोर आली. या सर्व हल्ल्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले होते. यामुळे पहलगाम येथे मृत्यूमुखी पावलेल्या शहीद पर्यटकांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. या ऑपरेशन सिंदूर बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय सैन्याचे कौतुक करणारे पोस्टर्स एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने दादर स्टेशन परिसरात लावण्यात आले आहेत. सविस्तर वाचा
शेअर बाजारात आज फ्लॅट ट्रेडिंग
आठवड्याचा चौथा ट्रेडिंग दिवस, शेअर बाजारात आज ट्रेडिंग स्थिर आहे. सेन्सेक्स सुमारे ३० अंकांनी घसरून ८०,७०० च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टी देखील २० अंकांनी घसरला आहे, तो २४,४०० वर व्यवहार करत आहे. सविस्तर वाचा
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.