
छत्रपती संभाजीनगरात वाळूजपासून २२ किमी अंतरावरील आरापूरच्या रुपाने १९०५ एकर (७६२ हेक्टर) जागेत नवी सहावी औद्योगिक वसाहत आकारास येणार आहे. त्यामुळे उद्योजकांना नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे. या एमआयडीसीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधीदेखील उपलब्ध ह
.
उद्याेजकांना सर्व सुविधा, मिश्र स्वरूपाची एमआयडीसी
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्योजकांना रस्ते, वीज, पाणी या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. मिश्र स्वरूपाची ही एमआयडीसी असेल. यामध्ये भूसंपादन करताना शेतकऱ्यांशी वाटाघाटी, त्यानंतर १ महिन्याची नोटीस, त्यानंतर आक्षेप अहवाल, अभिप्राय, सुनावण्या, नंतर नुकसान भरपाई मान्यता अशी प्रक्रिया असेल. साधारण ६ महिन्यांपर्यंतचा हा कालावधी लागू शकतो. त्यानंतर महसूलकडून ताबा मिळवणे, भूधारकांना नुकसान भरपाई वाटप करणे, ताबाप्राप्त जमिनीचा आराखडा बनवणे, त्यानुसार विकास कामे करणे अशी प्रक्रिया असेल.
इटालियन कंपन्यांसाठी संभाजीनगरातील ऑरिक सिटीत विशेष औद्योगिक टाऊनशिप उभारण्याचा प्रस्ताव केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी दिला आहे. इटली दौऱ्यादरम्यान छत्रपती संभाजीनगरकरांसाठी गोयल यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. इटालियन कंपन्यांसाठी भारतात खास औद्योगिक वसाहती (इंडस्ट्रियल एन्कलेव्ह) निर्माण करण्याच्या प्रस्तावात महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईजवळील दिघी ही दोन स्थळे निश्चित करण्यात आली असून, यातील एक महत्त्वाचे केंद्र म्हणून ऑरिक सिटीची निवड करण्यात आली आहे. या वसाहतीत इटालियन कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सर्व सुविधा उदा. इटालियन अभ्यासक्रमावर आधारित शाळा व महाविद्यालये, इटलीतील आरोग्य विमा योजनांना स्वीकारणारी हॉस्पिटल्स असेल, असे गोयल यांनी सादरीकरणात सांगितले.
एमआयडीसीत उद्योजकांसाठी संधी
आरापूर क्षेत्र ओद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित झाले आहे. त्यामुळे उद्योजकांसाठी मोठी संधी असणार आहे. यामध्ये ७६२ हेक्टर जागा उपलब्ध असणार आहे. यासाठी वैजापूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना भूसंपादन अधिकारी नेमण्यात आले आहे. आता भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होईल. -अमित भामरे, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी. सुमारे १ लाख रोजगार निर्मिती गेल्या अनेक वर्षांपासून शहराला एका एमआयडीसीची गरज होती. या निमित्ताने वाळूजजवळच्या उद्योगांना पर्याय मिळाला. त्यामुळे आगामी काळात साधारण एक लाख लोकांना रोजगार मिळेल. त्यामुळे शहराच्या विकासात नवीन भर पडेल. -अर्जुन गायकवाड, अध्यक्ष मसिआ
या गावांतून होणार जमिनीचे संपादन आरापूर- आरापूर १७१.८० हेक्टर सुलतानाबाद- १७७.६२ हेक्टर गवळी शिवरा- ४१२.६१ हेक्टर एकूण- ७६२.०३ हेक्टर
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.