
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार बाजारातील गर्दी, वाहनांचे प्रदूषण आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फटाक्यांची धमाकेदार आतिषबाजीमुळे नागपुरातील हवेची गुणवत्ता खराब झाली. यामध्ये महाल हे सर्वाधिक प्रदूषित क्षेत्र आहे. तिथे सर्वात जास्त म
.
नागपूरमधील प्रदूषण १४ ऑक्टोबरपासून वाढले आणि दिवाळीत ते आणखी वाढले. नागपूरची हवा दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात फटाके फोडल्यामुळे प्रदूषित झाली आहे. विशेषतः दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हवेच्या गुणवत्तेत मोठी घट झाली आणि महाल परिसरासारख्या ठिकाणी हवेचा गुणवत्ता निर्देशांक १२५६ पेक्षा जास्त नोंदवला गेला. हा परिणाम फटाक्यांमुळे निर्माण होणाऱ्या धूर, विषारी वायू आणि कणांमुळे झाला आहे. दिवाळीत मोठ्या संख्येने फटाके फोडल्यामुळे हवेत सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड), कार्बन मोनोऑक्साइड आणि सूक्ष्म कण तसेच प्रदूषकांची पातळी वाढली आहे. सर्वाधिक फटाक्यांच्या धुरामुळे हवेची गुणवत्ता खालावली असून, ती “खूप खराब’ श्रेणीत पोहोचली आहे, असे पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.
फटाक्यांच्या धुरामुळे होणारे प्रदूषण केवळ तात्पुरते नसते, तर आरोग्यावरही त्याचा नकारात्मक परिणाम होतो, विशेषतः श्वसनाशी संबंधित समस्या वाढू शकतात. नागरिकांनी हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी जबाबदारीने फटाके फोडण्याचे आणि शक्य असल्यास हरित फटाक्यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी जबाबदारीने दिवाळी साजरी करावी आणि फटाक्यांचा वापर कमी करावा. कारण, थोड्या वेळासाठी दाट धूर झाला तरी हवेची गुणवत्ता “खूप खराब’ श्रेणीत जाऊ शकते असे चोपणे यांनी सांगितले.
चोपणे यांनी स्पष्ट केले की, दिवाळीच्या काळात काही नैसर्गिक गोष्टींमुळे हवा आणखी खराब होते. रात्रीचे तापमान कमी होते, वाऱ्याचा वेग मंदावतो आणि हवेचे थर एकमेकांवर आदळल्याने प्रदूषक कण जमिनीलगत जमा होतात. हे बारीक कण साचल्यामुळे हवा पसरत नाही आणि सणासुदीनंतरही अनेक दिवस प्रदूषण पातळी जास्त राहते. फटाक्यांमधून निघणारा धूर हा हवेतील सूक्ष्म कणांचे प्रमाण वाढवतो. हे कण आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असतात. विशेषतः लहान मुले आणि वृद्धांना याचा जास्त त्रास होऊ शकतो. त्यामुळे, या दिवाळीत फटाके कमी वाजवून पर्यावरणाची काळजी घेण्याचे आवाहन चोपणे यांनी केले आहे.
असा ठरतो प्रदूषण निर्देशांक
० ते ५० एक्युआय | उत्तम |
१०१ ते २०० एक्युआय |
मध्यम |
२०१ ते ३०० एक्युआय |
खराब |
३०१ ते ४०० एक्युआय |
अतिशय खराब |
४०१ ते ५०० एक्युआय |
गंभीर |
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.