digital products downloads

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अडचणीत वाढ: 2 दिवसांत 22 कोटी भरा, नाहीतर जप्तीची कारवाई; महापालिकेची रुग्णालयाला नोटीस – Pune News

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अडचणीत वाढ:  2 दिवसांत 22 कोटी भरा, नाहीतर जप्तीची कारवाई; महापालिकेची रुग्णालयाला नोटीस – Pune News

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अडचणीत वाढ झाली आहे. तनिषा भिसे या गर्भवती महिलेला 10 लाखांसाठी उपचार नाकारणाऱ्या या रुग्णालयाने पुणे महापालिकेचा तब्बल 27 कोटींचा मिळकत कर थकवला आहे. सुमारे सहा वर्षांपासून हा कर थकवल्याची माहिती आहे. या प्रकर

.

पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालय तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. तनिषा भिसे या गर्भवती महिलेला 10 लाखांसाठी उपचार नाकारल्याने तिच्या मृत्यूस रुग्णालय कारणीभूत ठरल्याचा आरोप केला जात आहे. महापालिकेने मिळकत कर वसूल न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आणि युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी दिला होता. आता महापालिकेने रुग्णालयाला दणका देत थकीत 22 कोटी रूपये कर भरण्यास सांगितले आहे.

पुणे महापालिकेने नोटिसीत काय म्हटले?

पुणे पेठ एरंडवणा, स. नं. 8+13/2 या मिळकतीचे कर आकरणी रजिस्टरी मालक म्हणून लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन या नावाची नोंद असून सदर मिळकतीचा मिळकत क्र. पी/4/01/00593000 असा असून सदर मिळकतीची सन 2024-2025 अखेर थकबाकी रक्कम रु. 27,38,62,874 इतकी आहे. सन 2016-17 रोजी मिळकतीची करण्यात आलेली कर आकारणी आपणास मान्य नसल्याने पुणे महानगरपालिका विरुद्ध आपण दावा दाखल केलेला होता. सदर दाव्याबाबत उच्च न्यायालयाने मिळकत करात समाविष्ट असलेल्या जनरल टॅक्सच्या 50% रक्कम + उर्वरित इतर कर भरणेबाबत कोर्ट आदेश दिले आहेत. त्यानुसार आपणाकडे सन 2014 ते सन 2025 अखेर 22,06,76,081/- इतकी थकबाकी कोर्ट आदेशानुसार दिसून येत आहे. सदर थकबाकीबाबत मा महापालिका आयुक्त यांचे दालनात बैठक झाली असून अतिरिक्त महापालिका आयुक्तांनी मिळकतीच्या थकबाकीबाबत व कोर्ट आदेशानुसार मिळकतीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कराधान नियम 42 चे तरतुदीनुसार जप्तीची कारवाई करणेबाबत तोंडी आदेश दिले आहेत.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडील थकबाकीबाबत अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत पृथ्वीराज बी. पी यांनी थकबाकी न भरणाऱ्या या मिळकतीवर नियम 42 च्या तरतुदीनुसार जप्तीची कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या मिळकतकर विभागाने लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनला नोटीस बजावली आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अडचणीत वाढ: 2 दिवसांत 22 कोटी भरा, नाहीतर जप्तीची कारवाई; महापालिकेची रुग्णालयाला नोटीस - Pune News

रुग्णालयाचे अधिष्ठाता पडले तोंडघशी

दरम्यान, रुग्णालयाचा महापालिकेचा जो कर आहे तो कोर्टाच्या अधीन आहे. महापालिकेचा एकही रुपया आम्ही थकवलेला नाही. आम्ही सगळे पैसे भरतो ते कोर्टातच भरतो. आता जे आम्ही कराचे पैसे भरतो ते कोर्टात भरतो. त्यात आमचा एकही रुपयाचा कर थकलेला नाही आणि थकूच शकत नाही, नाहीतर बंद करतील, असे दीनानाथ रुग्णालयाचे अधिष्ठाता धनंजय केळकर म्हणाले होते. मात्र, आता महापालिकेने पाठवलेल्या नोटिसीमुळे धनंजय केळकर हे तोंडघशी पडले आहेत.

काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महानगर पालिकेवर संताप व्यक्त करत रुग्णालयाने थकवलेला 27 कोटींचा कर का वसूल करण्यात आला नाही ? असा सवाल केला होता. सर्वसामान्य नागरिकांनी कर थकवला, तर कर वसूली साठी त्यांच्या घरामोर बॅंड वाजवला जातो. मात्र, दवाखान्याने एवढी मोठी रक्कम थकवून देखील कोणतीच कारवाई करण्यात आली नाही, असा संताप सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला होता.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp