
Politics On India Pakistan Match: रविवारी होणा-या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरुन खासदार संजय राऊतांनी सरकारवर सडकून टीका केलीय. पहलगाममध्ये हिंदू महिलांचं पुसलेलं सिंदूर भाजप विसरली का असा सवाल राऊतांनी विचारलाय. रविवारी या क्रिकेट सामन्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महिला आघाडी सिंदूर रक्षा आंदोलन करणार आहे.
येत्या 14 सप्टेंबरला आशिया चषक स्पर्धेत भारत-पाकिस्तानमध्ये हायहोल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. मात्र, या सामन्याआधी महाराष्ट्रात मोठं रणकंदन सुरु झालंय. पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरमधून उत्तर दिलंय. त्यानंतर भारत पाकिस्तानमधील संबंध आणखीनच गंभीर झालेत. त्यात भारत-पाकिस्तान सामन्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केलीये.
या सामन्याच्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीकडून माझं कुंकू-माझा देश आंदोलन छेडलं जाणार आहे.
सरकार 26 निरपराध लोकांची हत्या आणि त्यांच्या कुटुंबांचा आक्रोश विसरलंय का असा सवाल खासदार संजय राऊतांनी विचारलाय. महिलांचं कुंकू पुसलं गेलंय त्याचाही विसर पडलाय का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. संजय राऊतांच्या या भूमिकेनंतर भाजपनेही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून केल्या जाणा-या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुंकू पाठवलं जाणार आहे. त्यावरून शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलं..
तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी ठाकरेंच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. जर रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही तर क्रिकेट कसं एकत्र खेळलं जावू शकतं असा सवाल सुळेंनी उपस्थित केलाय.
भारत पाकिस्तान सामना होऊ नये अशी मागणी अनेकांकडून केली जातेय. यासंदर्भात विधी शाखेच्या चार विद्यार्थिनींनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने याचिकेवर तत्काळ सुनावणीस नकार दिलाय. आशिया चषक स्पर्धेत 14 सप्टेंबरला रंगणारा भारत-पाकिस्तान सामना होऊ द्या, तो थांबवणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय..
येत्या 14 सप्टेंबरला भारत-पाकिस्तान सामना होणार आहे. बीसीसीआयने हा सामना रद्द करावा आणि भारतीयांच्या भावनेसोबत खेळणं थांबवं अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य भारतीय व्यक्त करतायत. त्यामुळे भारत-पाकिस्तान नियोजित वेळापत्रकानुसार होणार की बीसीसीआय काही निर्णय घेणार याकडे लक्ष लागलंय.
FAQ
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष भारत-पाकिस्तान सामन्याविरुद्ध का आंदोलन करत आहे?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात २६ निरपराध व्यक्तींची हत्या आणि महिलांचे कुंकू पुसले जाण्याच्या घटनेचा उल्लेख करत या सामन्याला विरोध केला आहे. ते सरकारवर टीका करत असून, १४ सप्टेंबरच्या भारत-पाकिस्तान सामन्याविरुद्ध महिला आघाडीने ‘सिंदूर रक्षा आंदोलन’ आणि ‘माझं कुंकू-माझा देश’ आंदोलन छेडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुंकू पाठवून निषेध व्यक्त केला जाणार आहे.
सुप्रीम कोर्टाने भारत-पाकिस्तान सामन्याबाबत काय निर्णय दिला?
चार विधी शाखेच्या विद्यार्थिनींनी १४ सप्टेंबरच्या भारत-पाकिस्तान सामन्यावर बंदी घालण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने तत्काळ सुनावणीस नकार देत हा सामना होऊ देण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, सामना थांबवला जाणार नाही, ज्यामुळे आता तो नियोजित वेळेनुसार होण्याची शक्यता आहे.
इतर पक्षांनी या आंदोलनाबाबत काय प्रतिक्रिया दिली आहे?
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवसेनेच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून, “रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही तर क्रिकेट कसं खेळता येईल?” असा सवाल उपस्थित केला आहे. मात्र, शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी संजय राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे, तर भाजपनेही राऊतांच्या टीकेला तितक्याच तीव्रतेने उत्तर दिले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.