
- Marathi News
- National
- Devotees’ Tractor Going For Durga Idol Immersion Overturns In Dam, 11 Dead, 26 Passengers In Trolley, 8 Children Among The Dead In Accident In Khandwa, Madhya Pradesh
खंडवा2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
मध्य प्रदेशात खंडवा जिल्ह्यातील पांढाणा येथे दुर्गा मूर्ती विसर्जनासाठी घेऊन जाणारा ट्रॅक्टर-ट्रॉलीसह अर्दला धरणात उलटल्याने अकरा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये आठ मुले आहेत.तर इतर तीन जण गंभीर जखमी झाले. गुरुवारी सायंकाही हा भीषण अपघातात झाला.
दुर्घटना घडली त्यावेळी ट्रॉलीमध्ये एकूण २६ भाविक मूर्तीसोबत बसले होते. ते नऊ दिवसांपासून त्यांच्या घरी असलेल्या मातृदेवतेच्या मूर्तीचे विसर्जनासा गेले होते, अपघातानंतर दोन तासांनी जिल्हा प्रशासन, होमगार्ड आणि एसडीआरएफ पथके घटनास्थळी पोहोचली.
प्राप्त माहितीनुसार जामली गावाजवळील राजगड पंचायतीतील पडल फाटा फलिया येथून लोक ट्रॅक्टर-ट्रॉलीने विसर्जनासाठी अर्दला धरणाकडे जात होते. एका पोलिस निरीक्षकाने ट्रॅक्टरला पाण्याच्या प्रवाहातून बाहेर येत असताना थांबवले, परंतु चालकाने नकार दिला पाण्यात २० ते २५ मीटर गेल्यानंतर, ट्रॉली एका बुडालेल्या कल्व्हर्टजवळ उलटली. ११ जण बुडाले. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.