
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना विविध विषयांवर भाष्य केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरू असलेल्या जाहिरातींवर देखील त्यांनी टीका केली आहे. अशा जाहिराती गुंड प्रवृत्तीचे लोक देतात तसेच अज्ञात व्यक्तीने
.
संजय राऊत म्हणाले, येणाऱ्या उपराष्ट्रपतींना आधीच्या राष्ट्रपतींनी काय चुका केल्या हे माहिती असणे गरजेचे आहे. जगडीप धनखड यांनी थोडा कणा असल्याचे दाखवले आणि त्यांची हकालपट्टी करण्यात आली. देश वाचवायचा असेल आणि संविधान वाचवायचा असेल तर आपल्याला महत्त्वाचे पाऊले उचलावे लागतील. देशाच्या सुरक्षेसाठी न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी यांना मतदान करावे. जगदीप धनखड यांचा राजीनामा हा थोतांड आहे. त्यामुळे देश वाचायचा असेल तर सुदर्शन रेड्डी हे योग्य उमेदवार आहेत.
इंडिया आघाडीचे जे खासदार आहेत ते एकत्र जमतील आणि येणाऱ्या राष्ट्रपतींची निवड कशी केली जाईल यावर चर्चा केली जाईल. क्रॉस व्होटिंगची देखील शक्यता आहे कारण भाजप प्रलोभने दाखवत मतदान करते. आमचे बरेचसे नगरसेवक दुसऱ्या पक्षात गेले असले तरी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक किंवा ठाण्याची निवडणूक असेल ही शिवसेना ठाकरे गट जिंकणार, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
लोकांनाही कळले पाहिजे की गणपती हा घरातला, देव्हाऱ्यातला किंवा सार्वजनिक असेल हा एकच असतो. देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी ज्या जाहिराती सुरू आहेत यावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, या जाहिरातींसाठी एकूण 50 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. हा दानशूर कर्ण कोण आहे जो देवाभाऊसाठी एवढा खर्च करत आहे. त्याला काय फायदा झाला आहे? मुख्यमंत्र्यांची एक आचारसंहिता असते, याचे पालन केले पाहिजे. अलीकडच्या काळात ही प्रथा बंद झाली. अशा प्रकारच्या जाहिराती हे गुंड लोक देतात, गुंड प्रवृत्तीचे बिल्डर देतात. दोन नंबरवाले लोक जाहिराती देतात.
अजित पवारांच्या मुद्द्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, सरकारी कामात हस्तक्षेप केला तर अजित पवारांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ज्यांनी सरकारमध्ये बसून हस्तक्षेप केला ते उपमुख्यमंत्री आहेत. यापूर्वी अनेकांना मंत्रिपद गमवावे लागले आहे. बॅरिस्टर अंतुले असतील त्यांना देखील पद गमवावे लागले. त्यामुळे स्वतः अजित पवार हे नीतिमान राजकारणी असल्याचे ते सांगतात, मग त्या महिला अधिकाऱ्याला जे काम सांगितले ते सार्वजनिक काम होते का? याचे उत्तर त्यांनी द्यावे. यावर मुख्यमंत्र्यांनी बोलले पाहिजे कारण ते या राज्याचे गृहमंत्री देखील आहेत. हेच काम जर विरोधकांनी केले असते तर भाजपने छाती बडवत आंदोलन केले असते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.