
बीड प्रकरणातील हैवानांचे हे फोटो व्हिडिओ मागील 2 महिन्यांपासून राज्याचे गृहमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे होते. आणि तरीही धनंजय मुंडे यांचा राजीनामा न घेता नैतिकतेची हत्या तुम्ही केली, असे म्हणत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका के
.
विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, पोलिस स्टेशनमधील सीसीटिव्ही बंद करून वाल्मीक कराडला पोलिस कोठडीत सर्व पंचतारांकित सुविधा दिल्या जात आहे. कारण ते मंत्री धनंजय मुंडे यांचे खासमखास असून त्यांच्याशिवाय मुंडेंचे पान हालत नाही.
नेमके वडेट्टीवारांचे ट्विट काय?
विजय वडेट्टीवार यांनी ट्विट केले आहे की, बीड प्रकरणातील हैवानांचे हे फोटो व्हिडिओ मागील 2 महिन्यांपासून राज्याचे गृहमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे होते. आणि तरीही धनंजय मुंडे यांचा राजीनामा न घेता नैतिकतेची हत्या तुम्ही केली! पोलिस स्टेशन मधील सीसीटिव्ही बंद करून वाल्मीक कराडला पोलिस कोठडीत सर्व पंचतारांकित सुविधा दिल्या.
सरकारने हिंमत दाखवली नाही
विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, हे सगळं का ? तर महायुतीतील मंत्री धनंजय मुंडे यांचा खासमखास आणि त्याच्याशिवाय या मंत्र्याचा पान ही हलत नाही म्हणून हैवान वाल्मीक कराड आणि त्याच्या साथीदारांचे लाड गृहमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलिसांनी पोसले. संपूर्ण महाराष्ट्राला चीड येईल असे संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आता महाराष्ट्रापुढे आले आहे. पण धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याची हिंमत अजूनही या सरकारने दाखवली नाही. राजीनाम्याला खूप उशीर झाला, आता तरी मुख्यमंत्री आणि उपमख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे.
सुत्रधारांवर कारवाई करावी- सुळे
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, वृत्तवाहिन्यांनी स्व. संतोष देशमुख यांना मारहाण होत असतानाचे फोटो प्रसारीत केले आहेत. हे फोटो पाहताना कोणत्याही संवेदनशील माणसाचा संताप झाल्याशिवाय राहणार नाही. हे फोटो पाहताना किती क्रूरपणे ही हत्या झाली असावी याचा अंदाज येतो. ही घटना आणि त्यातील क्रौर्य प्रचंड अस्वस्थ करणारे आणि माणूसकीला काळीमा फासणारे आहे. याप्रकरणी ज्या शक्तींचा वारंवार उल्लेख होत आहे त्या शक्तींवर कारवाई झालीच पाहिजे. उभा महाराष्ट्र आज देशमुख कुटुंबीयांच्या न्याय्य मागणीच्या मागे ठामपणे उभा आहे. स्व संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे ही आमची भूमिका आहे. मुख्यमंत्री महोदयांनी जनभावना लक्षात घेऊन जनतेला आश्वस्त करण्याची आवश्यकता आहे. त्यांना माझी नम्र विनंती आहे की कृपया आपण या घटनेशी संबंधित प्रत्येक व्यक्ती आणि त्यांच्या सुत्रधारांवर कारवाई करावी.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.