digital products downloads

दोन महिन्यांनंतर सोने दीड लाखाच्या आत: सोन्यात 3,811 तर चांदीत 7,210 रुपयांची घसरण – Jalgaon News

दोन महिन्यांनंतर सोने दीड लाखाच्या आत:  सोन्यात 3,811 तर चांदीत 7,210 रुपयांची घसरण – Jalgaon News



जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धासह अनेक घडामोडींमुळे सोने-चांदीच्या दराला घसरण लागली आहे. शनिवारी सोन्याच्या दरात ३,८११ रुपयांची घसरण झाल्याने सोने दोन महिन्यांनंतर दीड लाखांच्या (१,४८,६२९ रुपये तोळा) खाली आले. चांदीही ७,२१० रुपयांनी कमी झाली असून दर २,३७,९३० रुपये प्रतिकिलोवर पोहोचला. नव्या वर्षात सोने-चांदीने दरवाढीचे उच्चांक गाठले होते. मात्र, जागतिक स्तरावर होत असलेल्या घडामोडींमुळे मार्च महिना सोने-चांदीसाठी घसरणीचा ठरतो आहे. सव्वाचार लाखांचा टप्पा गाठणारी चांदी अडीच लाखांखाली आली आहे. शनिवारी सोनेदेखील दीड लाखांच्या खाली आले. २० जानेवारीला १,४९,२४७ रुपयांवर सोने होते. आज दोन महिन्यांपूर्वीच्याच भावावर सोने येऊन ठेपले. खरेदीला वेग येण्याची शक्यता आता सोने दीड लाखाच्या खाली आल्याने लग्नसराई आणि इतर कारणांसाठी खरेदीचा ट्रेंड वाढू शकतो. मात्र अस्थिर वातावरणामुळे साशंकता आहे, अशी माहिती आंतरराष्ट्रीय बाजाराचे अभ्यासक आदित्य नवलखा यांनी दिली. ही आहेत घसरणीची प्रमुख कारणे….

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp