
शहरातील द्याने भागात दिवसभर विजेचा लपंडाव सुरू असल्याने यंत्रमाग व्यवसाय वारंवार ठप्प होत आहे. त्यामुळे वीज भारनियमन काळात कापड उत्पादन नसतानाही कामगारांना वेतन द्यावे लागत आहे. खाजगी वीजवितरण कंपनीच्या (एमपीएसएल) मनमर्जी कारभाराला उद्योजक वैतागले आह
.
मालेगाव महानगर क्षेत्रातील विजेची मागणी व पूरक पुरवठा यात सध्या ताळमेळ दिसून येत नाही. वीज वितरण कंपनीने वीजेच्या देखभाल व दुरुस्तीसाठी खाजगी ठेकेदार संस्थेला काम दिले आहे. मात्र सदर कंपनीकडे शहराचा वाढता विस्तार, लोकसंख्या पाहता नियोजन नाही. तोकडे मनुष्यबळ असून देखभाल व दुरुस्तीसाठी तज्ज्ञांचा अभाव दिसतो. त्याचा परिणाम वीजपुरवठ्यावर होतो. तातडीच्या भारनियमनाची पूर्वसूचना याकडे कंपनीचे गांभीर्याने लक्ष नसल्याचे दिसून येते. कंपनीचे मुख्य अधिकारी (सिईओ) प्रेमसिंग यांच्याशी वारंवार संपर्क, चर्चा करूनही सुधारणा होत नसल्याची तक्रार यंत्रमाग मालकांनी केली आहे. अर्धा-अर्धा दिवस वीज खंडित असली तरी कामगारांना पूर्ण दिवसाचा पगार द्यावा लागतो. त्यामुळे या कारखानदारांचे उत्पादन आणि आर्थिक नियोजन गडबडले असल्याने उत्पादक चिंतेत आहे. दरम्यान, महावितरणने दिलेला ठेका रद्द करण्याची मागणी होत आहे. मोठ्या प्रमाणात कापड निर्मिती व्यवसायात गुंतवणूक केली आहे. वारंवार वीज खंडित होते. त्यामुळे कामगारांचा विनाकाम पगार द्यावा लागतो व कापड उत्पादनातही घट होते. हा व्यवसाय चालवावा की नाही, अशी द्विधा मनस्थिती झाली आहे. – अनिल देशमुख , कापड उत्पादक वीज कंपनी ठेकेदारावर कोणाचाही वचक नाही. अवाढव्य वीजबिल भरूनही नियमित वीज पुरवठा होत नाही. त्यामुळे आर्थिक नुकसान होते. हा ठेका रद्द करून पूर्ववत महावितरणने काम हाती घेऊन येथील विजेची समस्या सोडवावी. – विजय पाटील, द्याने पॉवर लूम असोसिएशन
गेल्या १५ वर्षांपासून द्याने इंडस्ट्रीसाठी नवीन एक स्वतंत्र सबस्टेशन मिळावे, यासाठी मालेगाव बाह्य आमदार तथा मंत्री दादा भुसे यांच्याकडे द्याने यंत्रमाग असोसिएशनचा पाठपुरावा सुरू आहे.वडगांव सबस्टेशन अतिरिक्त भार असल्याने वारंवार वीज खंडित होण्याची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे तासंतास वीजपुरवठा खंडित राहतो.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.