digital products downloads

धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तर कार्यक्रम खल्लास: गोविंद फड यांची मनोज जरांगेंना थेट धमकी, सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ – Beed News

धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तर कार्यक्रम खल्लास:  गोविंद फड यांची मनोज जरांगेंना थेट धमकी, सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ – Beed News



मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यातील वाद आता विकोपाला गेल्याचे पाहायला मिळत आहे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आणि परळी बाजार समितीचे माजी सभापती गोविंद फड यांनी सोशल मीडियावर एक खळबळजनक पोस्ट शेअर करत मनोज जरांगे पाटील यांना थेट धमकी दिली आहे. “धनंजय मुंडे यांच्या केसाला पण धक्का लागला, तर कार्यक्रम खल्लास… जरांगे, सुरेश धस भंडारा लावून बोलतोय,” अशा आशयाची ही पोस्ट सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे. गेल्या काही महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यात सातत्याने शाब्दिक युद्ध सुरू आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर हा वाद सुरू झाला. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असून तो सध्या तुरुंगात आहे. या घटनेवरून जरांगे पाटील यांनी मुंडेंवर गंभीर आरोप करत सडकून टीका केली होती. आपल्याला मारण्याचा कटाचा जरांगेंकडून दावा काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी आपल्याला मारण्याचा कट रचला जात असल्याचा खळबळजनक दावा केला होता. या प्रकरणात अमोल खुणे नावाच्या तरुणाला संशयित म्हणून अटक करण्यात आली होती, जो सध्या जामिनावर बाहेर आहे. या कटामागेही राजकीय हात असल्याचा संशय जरांगे यांनी व्यक्त केला होता, ज्यामुळे परळी आणि आसपासच्या परिसरात तणाव वाढला होता. धमकीच्या पोस्टने ठिणगी पडली गोविंद फड यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यासह आमदार सुरेश धस यांचाही उल्लेख केल्याचे समजते. ‘धनंजय मुंडे यांच्या केसाला पण धक्का लागला तर कार्यक्रम खल्लास.. जरांगे, सुरेश धस भंडारा लावून बोलतोय’ असा मजकूर या पोस्टमध्ये आहे. “भंडारा लावून बोलतोय” या शब्दांतून त्यांनी दिलेली ही चेतावणी थेट संघर्षाला आमंत्रण देणारी असल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात अद्याप गोविंद फड किंवा धनंजय मुंडे यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र सोशल मीडियावर या पोस्टमुळे आता वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे ही वाचा… छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान:महसूल सेवा आता घरापर्यंत, शिबिरांतून 15 प्रमुख सेवांचा लाभ मिळणार – चंद्रशेखर बावनकुळे राज्यातील जनतेला महसूल विभागाच्या महत्त्वाच्या १५ सेवा एकाच छताखाली आणि थेट घरपोच मिळाव्यात, यासाठी राज्य सरकारतर्फे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक महसुली मंडळ, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना दिली. सविस्तर वाचा…

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp