
माझगाव सत्र न्यायालयाने धनंजय मुंडे यांना दणका दिला आहे. कोर्टाने धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळली आहे. कौटुंबिक न्यायालयाने धनंजय मुंडे यांना पत्नी करुणा मुंडे यांना 2 लाखांची पोटगी देण्याचा आदेश दिला होता. धनंजय मुंडे यांनी या निर्णयाला आव्हान देत सत्र न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी सुनावणी झाली असता, कोर्टाने धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळून लावत सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना 6 फेब्रुवारीला वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने करुणा शर्मांना 2 लाखांची देखभाल खर्च देण्याचा आदेश दिला होता. करुणा शर्मा याच धनंजय मुंडे यांच्या प्रथम पत्नी असल्याचा कोर्टाचा निर्वाळा असून, या प्रकरणात घरगुती हिंसाचार झाल्याचा दावा देखील कोर्टानं मान्य केला होता. दुसरीकडे करुणा मुंडे यांनी आपल्याला 15 लाखांची पोटगी मिळावी अशी मागणी केली होती. “माझी दर महिना 15 लाखांची मागणी आहे. माझा 1 लाख 70 हजारांचा घराचा हफ्ता आहे. 7 ते 8 महिन्यापांसून हफ्ता भरलेला नाही. 30 हजारांचा मेंटेनन्स आहे. मुलगा घऱात बेरोजगार बसला आहे. 2 लाखात काय होणार?,” अशी विचारणा करुणा मुंडे यांनी केली होती.
कोर्टात नेमकं काय घडलं?
सुनावणीच्या सुरुवातीला धनंजय मुंडे यांच्या वकील सायली सावंत यांनी सांगितलं की, “लग्नाचे पुरावे सादर करण्यास सांगितलं होतं, मात्र मृत्यूपत्र आणि स्वीकृतीपत्र सोडून बाकी सगळी कागदपत्रं त्यांनी आणली आहेत. त्यांना काही अर्थ नाही. त्यावर धनंजय मुंडेंच्या वकिलांनी आम्ही आधीच कागदपत्रं दिली आहेत ज्यामध्ये करूणा मुंडे माझ्या पत्नी नाही हे आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहोत असं सांगितलं.
‘मी ठेवलेली बाई नाही, तर धनंजय मुंडेंची पहिली पत्नी आहे’; करुणा शर्मांना अश्रू अनावर, ‘माझा नवरा…’
मृत्यूपत्रात जे काही खों नमूद करण्यात आलं आहे त्यासंदर्भात करुणा मुंडे यांच्याविरोधात कायदेशीर तक्रार करण्यात आलेली आहे. त्यांनी खोटी कागदपत्रं बनवली असून त्यातल्या गोष्टी आम्ही नाकारत आहोत असं सायली सावंत यांनी सांगितलं. हिंदू विवाह कायद्यानुसार लग्न झाल्याचा कोणता पुरावा; नवरा-बायकोप्रमाणे नातेसंबंध; जबाबदा-या या केसमध्ये दिसत नाहीत असाही युक्तिवाद त्यांनी केला.
करुणा मुंडेंनी यावेली कोर्टासमोर स्वत:साठी बाजू मांडण्याची विनंती केली. मला पण बोलायचं आहे. 27 वर्षं आम्ही सोबत राहिलोय. मीही बोलते माझ्या पतीला बोलवा. माझे वकील ते चांगल्या पद्धतीने मांडू शकत नाहीत ते मी मांडू शकते असं त्यांनी म्हटलं. यावर कोर्टाने तुमचे वकील आहेत तर त्यांना बोलू द्या. मी म्हणणे ऐकून योग्य तो निर्णय देईन असं आश्वस्त केलं.
करुणा मुंडेंवर धनंजय मुंडेंच्या वकिलांनी युक्तीवादादरम्यान मोठा आरोप केला. करुणा मुंडे यांनी पुराव्यादाखल सादर केलेल्या कागदपत्रांवर धनंजय मुंडेंच्या खोट्या सह्या घेतल्याचा आरोप करण्यात आला. करुणा मुंडेंनी सरकारी कागदपत्रंही, जसं पासपोर्ट आणि इतर कागदपत्रेही खोट्या पुराव्यांच्या आधारे मिळवल्याचा आरोप करण्यात आला. करुणा मुंडेंनी सादर केलेले रेशन कार्डही इंदौर महापालिकेचं असून ते बनावट आहे असा आरोप धनंजय मुंडेंच्या वकीलांनी केला.
‘माझा बाप जगातला सर्वोत्कृष्ट बाप नसला तरी…’, धनंजय मुंडे आणि करुणा शर्मांच्या मुलाची पोस्ट, ‘आईनेच खरं तर…’
दरम्यान करुणा मुंडेंकडून मृत्यूपत्र, स्वीकृती यावर ज्या सह्या आहेत, अंगठ्याचा ठसा आहे ते धनजय मुंडे यांचीच आहे असा दावा केला. तसंच राज घनवट यांची देखील सही आहे असं सांगण्यात आलं. होम लोनमध्ये धनजय मुंडे गॅरेंटर आहेत अशी माहिती दिली. पुरावे नसते तर मी समोर आली नसती असंही त्या म्हणाल्या.
मी पहिली बायको आहे. जे मिळेल ते मिळेल त्याच्याशी काहीही सबंध नाही. पण मी पहिली बायको आहे हे मला सिद्ध करायचं आहे असं त्यांनी सांगितलं.
मला रस्त्यावर आणि मीडियावर आणणारा धनजय मुंडे आहे. हिरोईनची ऑफर होती पण मी पती सोबत राहण्याचा निर्णय घेतला. माझ्या सोबत लग्न करणाऱ्याला धंनजय मुंडे 20 करोड रुपये देणार होते असा खळबळजनक आरोप त्यांनी केला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.