digital products downloads

धनगरवाडी विहीर प्रकरण: तत्कालीन गटविकास अधिकारी, लेखाधिकारी, ग्रामसेवकांच्या विभागीय चौकशीचे प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश, दोघांच्या सेवा समाप्त – Hingoli News

धनगरवाडी विहीर प्रकरण:  तत्कालीन गटविकास अधिकारी, लेखाधिकारी, ग्रामसेवकांच्या विभागीय चौकशीचे प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश, दोघांच्या सेवा समाप्त – Hingoli News



सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथे कागदावर खोदकाम केलेल्या विहीर प्रकरणात तत्कालीन गटविकास अधिकारी सहाय्यक लेखाधिकारी, ग्रामसेवक यांच्या विरुध्द विभागीय चौकशीचे प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले आहेत. तर दोन जणांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या आहेत. सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथे रामचंद्र खडसे यांच्या शेतात विहीरीचे खोदकाम झाल्याचे दाखवून सुमारे २ लाख रुपयांची रक्कम मजूरांच्या खात्यात टाकून उचलण्यात आली आहे. मात्र या प्रकरणाच्या चौकशीमध्ये प्रत्यक्षात जागेवर कुठल्याही प्रकारचे खोदकाम झाले नाही तसेच विहीर खोदल्याचे कुठल्याही प्रकारचे पुरावे जागेवर आढळून आले नाही. याबाबतचा अहवाल नायब तहसीलदार नकुल वाघुंगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पालक तांत्रीक अधिकारी के. बी. देशपांडे यांच्यासह सहाय्यक कार्यक्रम अधिकारी वाकुडकर यांच्या सेवा समाप्त करण्याच आदेश काढले आहेत. या दोघांना तातडीने कार्यमुक्त करण्याचे आदेश जिल्हा परिषदेला दिले आहेत. या शिवाय तत्कालीन गटविकास अधिकारी, सहाय्यक लेखाधिकारी व ग्रामसेवक यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करावी, पालक तांत्रिक अधिकारी व ग्रामरोजगार सेवक यांच्यावर गुन्हा दाखल करून अपहार झालेली रक्कम वसुल करावी असे आदेशही जिल्हाधिकारी गुप्ता यांनी दिले आहेत. त्यावरून आता जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, उपमुख्यकार्यकारी अधिकारी केशव गड्डापोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृध्दी दिवाने यांनी तत्कालीन गटविकास अधिकारी, सहाय्यक लेखाधिकारी व ग्रामसेवक यांच्या विभागीय चौकशीचे प्रस्ताव तयार करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp