
सांगलीतील ऋतुजा राजगे या 7 महिन्यांच्या गर्भवती विवाहितेने धर्मांतराला कंटाळून आत्महत्या केली. या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ सांगलीत मुक निषेध मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त वि
.
सांगली जिल्ह्यातील गुंडेवाडी गावात ख्रिश्चन धर्मांतरासाठी सासरच्यांकडून सात महिन्यांची गर्भवती ऋतुजा राजगे हिला छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. या मानसिक छळाला कंटाळून ऋतुजाने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ सांगली शहरात विराट मशाल मोर्चा काढण्यात आला. यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत आक्रमक भाषेत धर्मांतरणावर जोरदार हल्लाबोल उपरोक्त विधान केले.
नेमके काय म्हणाले गोपीचंद पडळकर?
धर्मवीर संभाजी महाराजांनी माझा जीव गेला तरी धर्म बदलणार नाही असे औरंग्याला सांगितले. हाल हाल होऊन मेले तरी तरी धर्म बदलला नाही, अशा धर्मवीर संभाजी महाराजांची विचारांची कन्या ऋतुजा आहे, असे पडाळकर म्हणाले. तिनेही धर्मासाठी बलिदान दिले. परंतु आपल्या लेकींनी अशी टोकाची पावले उचलायला नको, यासाठी आता आपण धर्मांतर घडवून आणण्यासाठी येणाऱ्यांना ठोकून काढण्याची मोहीम सुरू करू, असे गोपीचंद पडळकर म्हणालेत.
‘लव्ह जिहाद’वाले हिरवे साप, ख्रिश्चन धर्मांतर करणारे अजगर
हिंदू धर्म कोणावर अन्याय करणार नाही. ऋतुजा ही उच्च शिक्षित मुलगी होती. ती स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होती. कोळी नामक नायब तहसीलदाराने ऋतुजाचे लग्न लावले तो आजही शासकीय सेवेत आहेत. पण सात महिन्यांची गर्भवती असताना छळापायी तिला जीवन संपवावे लागले. यापुढे धर्मांतर करण्यासाठी जो व्यक्ती गावात घरात येईल आणि बळजबरी करेल त्याला बदडून काढा. लव्ह जिहाद करणारे जसे हिरवे साप आहेत तसे ख्रिश्चन धर्मांतर करणारे अजगर आहेत. अशा अजगरांवर जेसीबी फिरवण्याचे काम केले पाहिजे, असे पडळकर म्हणाले.
पादरीचा सैराट करणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस
आपल्याकडे बैलगाडीच्या शर्यतीसाठी बक्षिसे ठेवली जातात. त्याप्रमाणे धर्मांतरासाठी येणाऱ्या पादरी लोकांना ठोकण्यासाठी बक्षीसे ठेवली पाहिजेत. पहिल्या पादरीला ठोकेल त्याला पाच लाखांचे बक्षीस. दुसऱ्याला मारेल त्याला चार लाखांचे, तर तिसऱ्याला मारेल त्याला तीन लाखांचे बक्षीस. जो कुणी पादरीचा सैराट करेल त्याला 11 लाखांचे बक्षीस ठेवले पाहिजे, असे विधान गोपीचंद पडळकर यांनी केले.
धर्मांतरासाठी येणाऱ्याचे खांडोळे करा, पोलिसांचे मी पाहीन
धर्मांतरण करणाऱ्यांच्या औलादीच्या कानावर माझा आवाज जात असेल तर त्यांनी ऐकावे….. राजकारण आमच्यासाठी महत्त्वाचा विषय नाही, हिंदू धर्म टिकला पाहिजे हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. अन्यथा येणारा काळ आम्हाला माफ करणार नाही. धर्मांतरासाठी येणाऱ्यांचे खांडोळे करा, पोलिसांचे मी बघून घेईन, असा इशारा पडाळकर यांनी दिला.
हिंदूंनीच फक्त कायदा पाळायचा का?
महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुख यांनी उद्याच्या उद्या सांगली जिल्ह्यातल्या बेकायदेशीर प्रार्थनास्थळाची यादी जाहीर कराव. तिसरया दिवशी ते प्रार्थनास्थळ उध्वस्त करावे. तसे झाले तर याच चौकात 10 हजार नागरीकांच्या उपस्थित सत्कार करु. अन्यथा तुमची गाठ हिंदू समाजाशी आहे. हिंदूंनीच फक्त कायदा पाळायचा का? सरकारी नोकरी हिंदू धर्मानुसार आरक्षण घेऊन झाली असेल आणि त्यानंतर धार्मिक पूजा वेगळी असेल तर त्यांना बडतर्फ करा, अशी मागणी पडाळकर यांनी दिली.
नेमके प्रकरण काय?
ऋतुजा हिचे 2021 मध्ये सुकुमार राजगे या तरुणाशी विवाह झाला होता. लग्नाआधी ऋतुजा ही हिंदू धनगर होती. परंतु लग्नानंतर धर्मांतर करण्यासाठी तिच्यावर सासरच्यांकडून दबाव होता, यासाठी तिला त्रास द्यायला सुरुवात केली, असा आरोप ऋतुजाच्या आई-वडिलांनी केला आहे. हिंदू पद्धतीने घरात कोणतीच पूजा करायची नाही, देवाला नमस्कार करायचा नाही, चर्चमध्ये जाऊन प्रार्थना कर अशी ताकीद सासू सासऱ्यांनी दिली. या छळाला कंटाळून ऋतुजाने अखेर टोकाचे पाऊल उचलले. ती 7 महिन्यांची गरोदर होती. पोलिसांनी राजगे कुटुंबाच्या विरोधात तक्रार नोंदवली असून आरोपींना अटक केली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.