
यंदा खासगी बाजारात सोयाबीनला मातीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धाव शासकीय खरेदी केंद्राकडे होती. जिल्ह्यात नाफेडमार्फत ही खरेदी सुरू होती. परंतु नोंदणी केलेल्या पूर्ण शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करण्यापूर्वीच शासकीय खरेदी ६ फेब्रुवारीला बंद कर
.
दरम्यान सोयाबीन आणले असतानाही खरेदीपूर्वीच शासकीय खरेदी बंद झाल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. मात्र, शासन निर्णय होऊन पुन्हा खरेदीचे आदेश येईपर्यंत काहीच करू शकत नाही असे, संबंधित खरेदी केंद्रावरील अधिकाऱ्यांनी सांगितले. तहसीलदार {उर्वरित. पान ४
शासनाकडून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार ^शासनाकडून नाफेडद्वारा शासकीय खरेदी राबवण्यात येते. दरवर्षी काही दिवसात शासकीय खरेदी विविध कारणांमुळे बंद केली जाते. कधी गोदामातील जागेअभावी तर कधी बारदाण्यामुळे बंद केली जाते. अशा कृत्रिम अडचणींमुळे शेतकरी भरडला जातो. यंदाही तोच कित्ता शासकीय खरेदीच्या बाबतीत गिरवला गेला. त्यामुळे शासनाकडून हा आमच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार आहे. -सूरज शिसोदे, शेतकरी, नायगाव.
डीएमओंना परिस्थिती सांगितली ^जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीबाबत चर्चा केली. शासनाकडून निर्देश येताच शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करण्यात येईल. -अभय घोरपडे , तहसीलदार, धामणगाव रेल्वे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.