
धामणगाव रेल्वे: आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत जाहीर झाली आहे. यामध्ये सभापतीपद महिलेसाठी राखीव ठेवण्यात आले असून, आठपैकी केवळ एकाच जागेवर कोणत्याही संवर्गातील उमेदवाराला निवडणूक लढवण्याची संधी मिळणार आहे. उर्वरित जागा विविध प्रवर्गां
.
एकूण आठ जागांपैकी चार जागा खुल्या प्रवर्गासाठी आहेत, तर दोन जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग (नामाप्र) आणि प्रत्येकी एक जागा अनुसूचित जाती (एससी) व अनुसूचित जमाती (एसटी) साठी राखीव आहे. खुल्या प्रवर्गातील चारपैकी अंजनसिंगी, पिंपळखुटा आणि तळेगाव दशासर या तीन जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. त्यामुळे चिंचोली ही एकमेव जागा अशी आहे, जिथे कोणत्याही संवर्गातील पुरुष किंवा महिला उमेदवार निवडणूक लढवू शकतील.
नामाप्रसाठी राखीव असलेल्या दोन जागांमध्ये निंभोरा-बोडखा आणि मंगरुळ दस्तगीर यांचा समावेश आहे. यापैकी मंगरुळ दस्तगीरची जागा महिलेसाठी राखीव असल्याने तेथे पुरुष उमेदवाराला संधी मिळणार नाही. अनुसूचित जातीसाठी जुना धामणगाव, तर अनुसूचित जमातीसाठी शेंदुरजनाखुर्द हे मतदारसंघ राखीव ठेवण्यात आले आहेत. या दोन्ही जागांवर पुरुष आणि महिला असे दोन्ही उमेदवार निवडणूक लढवू शकतील.
तहसीलदार आशिष घोरपडे यांच्या उपस्थितीत सोमवारी आठ गणांची आरक्षण सोडत काढण्यात आली. या आरक्षणामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, तर काही जणांना निवडणूक लढवता येणार नसल्याने त्यांना नव्या संधी शोधाव्या लागणार आहेत. महिलांना मिळालेल्या या मोठ्या संधीमुळे अनेक नवीन चेहरे राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता आहे. दोन वर्षांच्या शांततेनंतर धामणगाव तालुक्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, आगामी काळात प्रचाराचा धुरळा उडताना दिसणार आहे.
दरम्यान, धामणगाव तालुक्यात जिल्हा परिषदेचे चार मतदारसंघ आहेत आणि हे चारही मतदारसंघ महिलांसाठी राखीव झाले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेत या तालुक्यातून शंभर टक्के महिलांचे प्रतिनिधित्व असेल. जुना धामणगाव, मंगरुळ दस्तगीर, तळेगाव दशासर आणि चिंचोली हे ते चार मतदारसंघ आहेत. यापैकी चिंचोली हा खुला असल्याने तेथे कोणत्याही जाती-जमातीच्या महिलेला निवडणूक लढवता येईल, तर उर्वरित तीन मतदारसंघात केवळ नामाप्र संवर्गातील महिलांना निवडणुकीत उभे राहता येणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.