
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. धाराशिव, बीड, सोलापूर या भागांत पुराच्या पाण्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील पिके वाहून गेली आहेत, जनावरे मृत्युमुखी पडली आहेत, अनेक घरं पाण्याखाली गेल्याने संसार उद्ध्वस्त
.
धाराशिवच्या जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांचा नवरात्र महोत्सवातील डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तुळजापूरात नवरात्र उत्सवानिमित्त मंदिर संस्थानकडून सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात दोन्ही वरिष्ठ अधिकारी मंचावर नाचताना दिसत आहेत. पावसाने हवालदिल झालेल्या जनतेला मदत करण्याऐवजी अधिकारी नवरात्र सोहळ्यात रंगलेले दिसल्याने पुरग्रस्तांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
अजूनही बचाव आणि मदतकार्य अपुरे असल्याच्या तक्रारी
या व्हिडिओनंतर नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पूरात शेतकरी उध्वस्त झाले, गावोगाव जनावरे वाहून जात आहेत, लोक घरदार गमावून रस्त्यावर आले आहेत. अशा गंभीर परिस्थितीत प्रशासनाने लोकांसोबत राहून मदतकार्य करायला हवं होतं. मात्र, अधिकारी नाचगाण्यात वेळ घालवत असल्याचं पाहून जनतेचा विश्वासच ढळला आहे, असे म्हणत नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विशेष म्हणजे, धाराशिव जिल्ह्यातील अनेक भागात अजूनही बचाव आणि मदतकार्य अपुरे असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.
प्रशासनाची बेफिकिरी नागरिकांच्या डोळ्यात खुपणारी
पूरस्थितीत प्रशासनाकडून संवेदनशीलता अपेक्षित असते. मात्र, अशा परिस्थितीत वरिष्ठ अधिकारीच सांस्कृतिक कार्यक्रमात नाचताना दिसल्याने प्रशासनाच्या भूमिकेबद्दल शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. शेतकरी आणि पुरग्रस्तांना तातडीने मदत पोहोचवून त्यांचे संसार उभे करण्याची गरज असताना प्रशासनाची ही बेफिकिरी नागरिकांच्या डोळ्यात खुपणारी आहे. त्यामुळे आता शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.