
मोबाईल आता आपल्या सगळ्यांची मुलभूत गरज आहे. याच मोबाईलमुळे अनेक अपघात झाल्याचं आपण याआधी अनेकदा ऐकलं असेल. पण नांदेडच्या माहूरमध्ये मोबाईलच्या अल्ट्रावेव्हमुळे अंगावर वीज पडून एकाचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे पावसाळ्यात मोबाईल वापरताना काळजी घेणं महत्वाचं आहे.
पावसात मोबाईल वापरताना सावधान
मोबाईलच्या अल्ट्रावेव्हमुळे अपघाताची शक्यता
विजेच्या कडकडात मोबाईलवर बोलणं टाळा
नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील शिक्षक संजय पांडे यांचा अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला. दुचाकीवरून जात असताना मालवाडा घाटात त्यांच्यावर वीज कोसळली. विशेष म्हणजे यात त्यांच्या खिशातील मोबाईल पूर्णपणे जळाला. मोबाईलच्या अल्ट्रावेव्हमुळे धावत्या दुचाकीवर वीज कोसळली का याची चर्चा यामुळे सुरु झाली आहे. तर गावातही भीतीचं वातावरण पसरलंय…
पावसात मोबाईल वापरताना सावधान
– वीज कोसळण्याच्या वेळी, वातावरणातील वायूंचे आयनायझेशन होऊन विद्युत प्रवाह निर्माण होतो
– वादळाच्या वेळी स्मार्टफोन वापरणे सामान्यता: सुरक्षित असते पण काळजी घेणं आवश्यक आहे
– मोबाईल वापरताना अतिनील किरणे उत्सर्जित होतात
– अतिनील किरणे वीजेला आपल्याकडे आकर्षित करतात तर वीज धातूला आकर्षित करते
– त्यामुळे पावसात वीज आणि मोबाईलचा किरणांचा संपर्क झाल्यास अपघात घडू शकतो
– वीज कडकडात उघड्यावर किंवा उंच ठिकाणी राहणे टाळा
– पावसात विद्युत खांब, विद्युत उपकरणे, मोबाईल वापरणं टाळा
मराठावाड्यात गेल्या वर्षी वीज पडून 38 जणांचा मृत्यू झाला होता. प्रामुख्याने वादळ आणि पावसापूर्वी, तसंच पावसादरम्यान विजा कोसळतात. विजेमध्ये प्रचंड उष्णता असते. त्यामुळे वीज पडल्यास काही क्षणात जागीच मृत्यू होतो. त्यामुळे विजेपासून बचाव करण्यासाठी सुरक्षित ठिकानी आश्रय घेणे हा सर्वात चांगला उपाय आहे. वीज धातू आकर्षित करते, त्यामुळे मोबाईल वापरणे धोकादायक ठरू शकते. म्हणून खबरदारीसाठी पावसात मोबाईलवर बोलणं टाळणं अधिक सुरक्षित आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.