
जावेद मुलाणी, झी मीडिया, बारामती : (Baramati News) एरव्ही राजकीय कारणांमुळं चर्चेत असणारं बारामती यावेळी मात्र नको त्या कारणामुळं चर्चेत आलं असून, एका मोठ्या प्रकणाच्या तपासाला यामुळं चालना देण्यात पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार बारामती शहर पोलिसांनी मेंफेंटरमाईन सल्फेट इंजेक्शनचा अवैध साठा पकडला आहे.
बारामती शहरातील भिगवण रोडवरील एका उच्चभ्रू जीमसमोर उभ्या असणाऱ्या क्रेटा कारमधून पोलिसांनी मेंफेंटरमाईन सल्फेट इंजेक्शनच्या तब्बल 90 सिलबंद बाटल्या हस्तगत केल्या. व्यायामशाळेत शरीरसौष्ठव करणाऱ्यांना इंजेक्शनचा पुरवठा होत असल्याचा संशय होता, त्यातूनच पोलिसांनी ही कारवाई करण्यात आली आहे. सदर प्रकरणातून बारामती शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, एकाला ताब्यात देखील घेण्यात आलं आहे. तन्मय कल्याण बनकर राहणार सहयोग सोसायटी समोर बारामती, याला ताब्यात घेण्यात आलं आहे. तर त्याचा मित्र राहुल उघाडे हा फरार आहे.
लाखोंचा मुद्देमाल…
बारामती शहर पोलिसांनी केलेल्या या कारवाईत पोलिसांनी तब्बल 29 हजार 184 रुपये किमतीच्या मेंफेंटरमाईन सल्फेट इंजेक्शन च्या 90 सीलबंद बाटल्या आणि 5 लाख रुपये किमतीची एक चार चाकी कार असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलिसांनी जप्त केलेली इंजेक्शन संबंधित व्यक्तीने कुठून आणली? कोणत्या उद्देशाने आणली? तो कोणाला इंजेक्शनचा पुरवठा करणार होता? या रॅकेटमध्ये आणखीन कोण कोण सहभागी आहेत? याची कसून चौकशी आता बारामती शहर पोलीस करत आहेत.
हेसुद्धा वाचा : ‘दहशत खपवून घेतली जाणार नाही…’; म्हणत CM फडणवीस संतापतात; रस्ता खोदून काढणाऱ्या वन विभागाला झापलं
दरम्यान, बारामती शहरातील काही व्यायामशाळा मध्ये शरीरसौष्ठव करणाऱ्या तरुणांना भूलशास्त्रज्ञ प्रसूतीच्या वेळी वापरतात ते मेंफेंटरमाईन सल्फेट इंजेक्शन घेण्यासाठी काहीजण प्रोत्साहित करतात अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरूच होती. मात्र ठोस असा कोणताही पुरावा समोर येत नव्हता. त्यामुळं अखेर या प्रकरणाचा बारामती शहर पोलिसांनी आता भांडाफोड केला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.