
जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी उमेदवारांना संकेतस्थळावर केवळ नामनिर्देशनपत्र व शपथपत्रातील माहिती भरणे आवश्यक आहे. यासोबत कोणतेही कागदपत्रे अपलोड करण्याची गरज नाही, अशी माहिती जिल्ह्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्ह
.
जिल्ह्यातील १० नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष आणि सदस्यपदासाठी नामनिर्देशपत्रे दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने https://mahasecelec.in हे संकेतस्थळ विकसित केले आहे. उमेदवारांनी या संकेतस्थळावर नोंदणी करून नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्रातील माहिती भरणे आवश्यक आहे.
संकेतस्थळावर परिपूर्ण माहिती भरल्यानंतर, त्याची मुद्रित प्रत (प्रिंट आऊट) काढून त्यावर उमेदवाराची स्वतःची व सूचकांची स्वाक्षरी घेणे अनिवार्य आहे. त्यानंतर ही प्रिंट पुरक कागदपत्रांच्या मूळ प्रतींसह (उदा. नगरपरिषद/नगरपंचायतीचे नादेय प्रमाणपत्र, शौचालय वापराबाबतचे प्रमाणपत्र किंवा स्वयंघोषणापत्र, निवडणुकीसाठी बँक खात्याचा तपशील, राखीव जागांवरील उमेदवार असल्यास जातप्रमाणपत्र, पक्षाचा उमेदवार असल्यास ‘जोडपत्र-१’ किंवा ‘जोडपत्र-२’ इत्यादी) संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल करणे आवश्यक आहे.
इच्छुक उमेदवारांसाठी नोंदणीसाठी सुरू केलेले संकेतस्थळ १७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत २४ तास सुरू राहील. उमेदवारांनी नोंदणी करताना तयार केलेला लॉगिन आयडी व पासवर्ड जपून ठेवावा, कारण नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्रातील माहिती भरण्यासाठी तो आवश्यक असतो. सही केलेल्या प्रिंटआऊटसह आवश्यक त्या संपूर्ण कागदपत्रांचा संच संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला विहित मुदतीत, म्हणजेच १७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत सादर करणे बंधनकारक आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



