digital products downloads

नरखेडमध्ये बालविवाह रोखला, 15 वर्षीय मुलीची सुटका: धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली 35 वर्षीय वरासोबत लग्न लावण्याचा प्रयत्न – Nagpur News

नरखेडमध्ये बालविवाह रोखला, 15 वर्षीय मुलीची सुटका:  धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली 35 वर्षीय वरासोबत लग्न लावण्याचा प्रयत्न – Nagpur News



नागपूरनरखेड तालुक्यातील मालापूर येथे धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावण्याचा प्रयत्न प्रशासनाने उधळला आहे. आठवीत शिक्षण घेणाऱ्या या मुलीचा विवाह तब्बल ३५ वर्षीय पुरुषासोबत करण्यात येत होता. माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करत विवाह थांबवून मुलीची सुटका केली. बाल संरक्षण कक्षाकडे या घटनेची तक्रार प्राप्त झाल्यानंतर कोंढाळी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मुलीला सुरक्षितपणे रेस्क्यू केले. या प्रकरणी नरखेड पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा बालविवाह धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली लपवून पार पाडण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, प्रशासनाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आणि एक मोठा अनर्थ टळला. या प्रकरणात बालविवाह प्रतिबंध अधिनियम तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशा प्रकारच्या विवाहाला पाठिंबा देणाऱ्या आयोजकांवर आणि उपस्थितांवरही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. या कारवाईत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील मेसरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, पोलीस निरीक्षक मंगला मोकाशी, जिल्हा बाल रक्षक समन्वयक प्रसेनजीत गायकवाड आणि चाइल्ड लाईन प्रतिनिधी मीनाक्षी धडाडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, सुटका करण्यात आलेल्या मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिला पुढील संरक्षणासाठी बालगृहात दाखल करण्यात येणार आहे. तिच्या पुनर्वसनाबाबतचा निर्णय बालकल्याण समितीकडे सोपवण्यात आला आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp