digital products downloads

नर्गिसने मानले राज ठाकरेंचे आभार: म्हणाली- जे पोलिसांकडून झाले नाही ते मनसैनिकांनी केले; काय आहे प्रकरण? – Mumbai News

नर्गिसने मानले राज ठाकरेंचे आभार:  म्हणाली- जे पोलिसांकडून झाले नाही ते मनसैनिकांनी केले; काय आहे प्रकरण? – Mumbai News



मुंबईतील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नर्गिस फ्रूटवालाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत. मनसेने आपल्याला केवळ मदतच केली नाही, तर माणुसकी म्हणून देखील सहकार्य केले. जे पोलिसांनी केले नाही ते मनसेने केले, अशा शब्दात नर्गिसने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मात्र नेमके झाले काय होते? जाणून घेऊया.. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेल्या नर्गिस फ्रूटवालाचा 4 लाख रुपयांचा कॅमेरा कॅबमध्ये विसरली होती. कॅमेरा विसरल्याचे लक्षात आल्यानंतर तिने संबंधित कॅब चालकाला संपर्क केला. मात्र, चालकाने कॅमेरा परत करण्यास नकार दिल्याचा आरोप नर्गिसने केला. त्यानंतर तिने चेंबूर आरसीएफ आणि एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी कॅब चालकाला कॉल केला, परंतु, आपल्याकडे काहीच नसल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर तिच्या संपर्कात असलेल्या एकाने मनसेची मदत घेण्याचे सुचवले आणि नर्गिस मनसेच्या शाखेत पोहोचली. मनसे वर्सोवा विधानसभा अध्यक्ष संदेश देसाई आणि शाखाध्यक्ष लक्ष्मण वाघमोडे यांनी नर्गिसच्या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेतली. नवी मुंबई परिसरात त्यांनी त्या कॅब चालकांचा शोध लावला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी चालकाच्या घराची झडती घेतली आणि कॅमेरा ताब्यात घेतला. अवघ्या 24 तासांतच नर्गिसला तिचा कॅमेरा मिळाल्याने तिने आनंद व्यक्त केला. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विभाग अध्यक्ष संदेश देसाई आणि शाखा अध्यक्ष लक्ष्मण वाघमोडे यांचे तिने आभार मानले आहेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp