
नवरात्रोत्सवात श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेला शिवकालीन, पेशवेकालीन दागिन्यांनी अलंकृत केले जाणार आहे. त्यासाठी पूर्वतयारीचा सुरू झाली असून या दागिन्यांची सफाई व गाठण्याचे काम मंगळवारपासून सुरू करण्यात आले आहे. यासंदर्भात मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी
.
यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील व पेशवेकालीन दागिन्यांचा समावेश आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेला हे दागिने नवरात्रोत्सवात परिधान करण्यात येतात. यातील अनेक अलंकार हे अनमोल आहेत. या अलंकारांचे जतन व सुरक्षिततेसाठी दरवर्षी गाठण्यात येतात. हे काम नवरात्रोत्सवापूर्वी करण्यात येते. दोन दिवसात हे काम पूर्ण होणार आहे. नवरात्रीच्या पहिल्या माळेपासून दररोज विविध अवतारात विठ्ठल रुक्मिणीची पूजा करताना हे दागिने परिधान करण्यात येणार आहेत.
श्री विठ्ठलास घालण्यात येणारे दागिने श्री. विठ्ठलास सोन्याचे पैंजण, बाजीराव कंठी, मत्स्य, तोडे, सोवळे, हिऱ्यांचा कंबरपट्टा, बाजूबंद, दंडपेट्या, मणिबंध, सोन्याची राखी, तुळशीची सोन्याच्या मण्यांत गुंफलेली माळ, कौस्तुभमणी, हिरे, पाचूंनी गुंफलेली मोत्यांची कंठी, बोरमाळ, मोत्यांच्या माळा, पुतळ्यांच्या माळा, मोहरांच्या माळा, नवरत्नांचा हार, सोन्याचे मुकुट, हिऱ्यांचा मुकुट, सोन्याची शिंदेशाही पगडी, चांदीची काठी, सोन्याची मकरकुंडले, नील व हिरे बसवलेला नाम- म्हणजे सोन्याचा गंध.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.