
Navi Mumbai Airport Latest Updates: नवी मुंबई विमानतळासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. इंडिगो आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड यांच्यात उड्डाणासंदर्भात पहिला करार झाला आहे. इंडिगोची विमानं लवकरच नवी मुंबई विमानतळावरुन उड्डाण घेणार आहेत. नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी एकाचवेळी 15 शहरात विमाने झेपवणार आहेत.
नवी मुंबई विमानतळ लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती या करारानंतर देण्यात आली. नवी मुंबई विमानतळावरुन पहिल्या दिवसापासून 15 पेक्षा जास्त शहरांमध्ये 18 दैनंदिन उड्डाणे (36 एअर ट्राफिक मॅनेजमेंट) सुरू केले जाणार आहे.
नोव्हेंबर 2025 पर्यंत 79 दैनंदिन उड्डाणे (158 एटीएम) केले जाणार असून, यामध्ये 14 आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा समावेश आहे.
सिडकोकडून नवी मुंबई विमानतळाचा विकास केला जाणार आहे. विमानतळाला चांगली कनेक्टीव्हिटी मिळावी यासाठी परिसरातील इतर मार्गाना विमानतळासोबत जोडलं जाणार आहे. त्यादृष्टीने काम सुरू असल्याची माहिती सिडकोच्या संचालकांनी दिली.
मुंबई विमानतळावर प्रवाशांचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे मुंबई विमानतळाला पर्याय म्हणून नवी मुंबई विमानतळ उभारण्यात येत आहे. 1160 हेक्टर परिसरात उभारण्यात येत आहे. या विमानतळाचा रनवे 3.7 किमी इतका लांब असून या विमातळावर एकाचवेळी 350 विमाने उभी राहू शकतात. हे विमानतळ पूर्णपणे कार्यन्वित झाल्यानंतर वर्षाला 9 कोटींहून अधिक प्रवासी प्रवास करु शकतात. या विमानतळाचा पहिला टप्पा एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर 2029 पर्यंत दुसरा टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर, तिसरा टप्पा 2032 पर्यंत आणि चौथा टप्पा 2036 पर्यंत पूर्ण होईल.
दरम्यान, पुरंदर विमानतळासाठी सात गावातून 794 हरकती नोंदवण्या आल्यात. आमची बागायती जमीन असून आम्ही भूमिहीन आणि बेघर होणार आहोत. त्यामुळे आमचा या प्रकल्पास विरोध असल्याच्या हरकती शेतक-यांनी नोंदवल्यात. 29 मे पर्यंत हरकती नोंदवण्याची मुदत आहे. त्यानंतर या हरकतींवर सुनावणी होणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.