
नांदगाव पेठ जिल्हा परिषद सर्कल महिला सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झाल्याने स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. यामुळे अनेक पुरुष उमेदवारांची दशकाहून अधिक काळाची प्रतीक्षा संपुष्टात आली असली तरी, त्यांच्या पत्नींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची
.
काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मतदारसंघात गेल्या दोन दशकांत तीन वेगवेगळ्या पक्षांनी सत्ता गाजवली आहे. २००२ मध्ये शिवसेनेचे नितीन हटवार यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर २००७ मध्ये त्यांच्या पत्नी मनीषा हटवार विजयी झाल्या. २०१२ मध्ये काँग्रेसचे विनोद डांगे यांनी बाजी मारली, तर २०१७ मध्ये भाजपच्या भारती गेडाम यांनी विजय मिळवला होता.सध्या राज्यात आणि केंद्रात भाजप सत्तेत असल्याने, भाजपकडून जिल्हा उपाध्यक्ष विवेक गुल्हाने यांच्या पत्नी मनीषा गुल्हाने यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
दुसऱ्या बाजूला, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून मनीषा हटवार पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत.काँग्रेसकडून सुनंदा केचे या संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. त्यांचे कुटुंब पारंपरिक काँग्रेस विचारसरणीचे असून, त्यांनी २०१२ ते २०१७ या काळात पंचायत समितीत प्रतिनिधित्व केले आहे. याशिवाय, भाजयुमो जिल्हाध्यक्ष सचिन इंगळे यांच्या पत्नी योगेश्वरी इंगळे आणि डिगरगव्हाण येथील सरपंच जिल्लेश्वरी ठाकरे यादेखील संभाव्य उमेदवारांच्या यादीत चर्चेत आहेत.अशाप्रकारे, आगामी निवडणुकीत नांदगाव पेठ सर्कलचा हा राजकीय संघर्ष केवळ पक्षीय लढाई न राहता महिला नेतृत्वाच्या बळकटीकरणाचे प्रतीक ठरणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.