
नागपूरच्या सदरमधील सेंट उर्सुला शाळेतील परीक्षा केंद्रावर बारावी बोर्डाचा केमिस्ट्रीचा पेपर फुटला. पेपर सुरू होण्याच्या तासभर आधीच तो व्हॉट्सअॅपवर फुटला. या प्रकरणी सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दाेन विद्यार्थिनींची चौकशी केली आहे. चाैकशीत फिजि
.
गुरुवारी बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर झाला. मात्र, परीक्षेआधीच हा पेपर विद्यार्थ्यांच्या व्हाॅट्सअॅप ग्रुपवर आला हाेता. सदर परिसरातील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर हे प्रकरण उघडकीस आले. एक विद्यार्थिनी वारंवार प्रसाधनगृहात जात होती. त्यामुळे केंद्रावरील पर्यवेक्षकाला संशय आला. ती विद्यार्थिनी तिसऱ्यांदा बाहेर गेल्यानंतर परत आली असता तिची शिक्षिकेने झडती घेतली. तिच्याकडील फोनमध्ये व्हॉट्सअॅप ग्रुपवर पेपर आलेला होता. शिवाय त्याच ग्रुपवर फुटलेल्या पेपरमधील प्रश्नांची उत्तरेही होती. या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये १५ विद्यार्थ्यांचा समावेश असून त्यांचा तपास सुरू आहे.
शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांवर संशय
या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हा पेपर किती जणांपर्यंत पोहोचला तसेच या रॅकेटमध्ये किती जण सहभागी आहेत याची माहिती पोलिस घेत आहेत. यात शिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचारी असण्याची शक्यता आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



