
नागपुरात एका ८ वर्षीय दिव्यांग मुलीवर तिच्याच पित्याने लैंगिक अत्याचार केल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात मुलीच्या आजोबांनीही साथ दिल्याचा आरोप आहे. पीडितेच्या आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी पिता आणि आजोबा या दोघांनाही अटक केली आहे. मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. मानकापूरचे पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या आईने तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी याप्रकरणी पिता आणि आजोबा या दोन्ही आरोपींना तात्काळ अटक केली आहे. पीडित मुलीच्या आईने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, तिचा ४१ वर्षीय पती गेल्या वर्षी जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत आपल्या ८ वर्षांच्या दिव्यांग मुलीवर सतत अत्याचार करत होता. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पिता मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यासोबत अश्लील चाळे आणि दुष्कृत्य करायचा. पीडितेच्या आईने या कृत्याला विरोध केला असता, आरोपी पतीने तिला मारहाण करून याबाबत कोणालाही न सांगण्याची धमकी दिली. यानंतर आईने ही बाब आपल्या ७० वर्षीय सासऱ्यांच्या (मुलीचे आजोबा) कानावर घातली. परंतु, सासऱ्यांनी कोणतीही मदत न करता, “ती त्याची मुलगी आहे, तो काहीही करेल” असे म्हणत, कुणाला काही सांगितल्यास माय-लेकीला गायब करण्याची धमकी दिली. अखेर, आईने मानकापूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



