digital products downloads

नादुरुस्त रस्त्यामुळे जळका-मोझरी मार्गावर रुग्ण, नागरिकांचे हाल: सामाजिक कार्यकर्त्याची विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंकडे तक्रार – Amravati News

नादुरुस्त रस्त्यामुळे जळका-मोझरी मार्गावर रुग्ण, नागरिकांचे हाल:  सामाजिक कार्यकर्त्याची विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंकडे तक्रार – Amravati News



तिवसा तालुक्यातील जळका येथील पौराणिक खंडोबा मंदिर ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मोझरी येथील समाधीस्थळापर्यंत जाणाऱ्या मुख्य ‘दिंडी मार्गा’ची गेल्या १५ वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. या खड्डेमय रस्त्यामुळे गंभीर रुग्ण आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी तातडीने रस्ता नूतनीकरण आणि रुंदीकरण करण्याच्या मागणीसाठी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना निवेदन दिले आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, या मार्गावर केवळ तात्पुरते खड्डे बुजवण्याचे काम केले जाते, ज्यामुळे रस्त्याची स्थिती सुधारत नाही. हृदयविकार, कॅन्सर आणि गर्भवती महिलांना याच मार्गावरून अमरावती येथील ‘अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल’मध्ये ने-आण केली जाते. मात्र, रस्त्यातील मोठ्या खड्ड्यांमुळे रुग्णांना रुग्णालयात पोहोचताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. निवेदन स्वीकारल्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष बनसोडे यांनी यासंदर्भात तातडीने बैठक आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याच मागणीसाठी ९ ते १२ मार्च या कालावधीत माणिकग्राम धोत्रा येथे बेमुदत उपोषणही करण्यात आले होते. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. या आंदोलनात प्रकाश चिचखेडे, अमोल वावरे यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले होते. जळका ते मोझरी हा मार्ग अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात किंवा वाहतूक कोंडी झाल्यास जड वाहनांसाठी एक महत्त्वाचा पर्यायी मार्ग म्हणून वापरला जातो. असे असूनही, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. दरवर्षी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त या मार्गावरून १०० हून अधिक दिंड्या पायी प्रवास करतात, त्यामुळे वारकऱ्यांनाही या खड्ड्यांचा सामना करावा लागतो.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp