
नाशिक विभाग विकास कार्यक्रम 2009 अन्वये नाशिक येथे गोरेगाव चित्रनगरीच्या धर्तीवर चित्रपट सृष्टी निर्माण करण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे. या चित्रनगरीसाठी प्रस्तावित असलेला नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीचा परिसर नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत सुसंपन्न व सुं
.
आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह याठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत छगन भुजबळ बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, आजही नाशिक परिसरामध्ये अनेक हिंदी आणि मराठी चित्रपट तसेच मालिकांचे चित्रीकरण केले जाते. नियोजन विभागाने सन 2009 ते 2012 या कालावधीसाठी नाशिक चित्रपटसृष्टीसाठी रुपये 10 कोटी इतका नियतव्यय सुद्धा मंजूर केलेला होता. या प्रकल्पासाठी मौजे मुंढेगाव ता. इगतपुरी येथे प्रत्यक्ष पाहणी करून सर्वे नंबर 459 येथील 54.58 हेक्टर मधील 47 हेक्टर 39.4 आर ही शासकीय जमीन सांस्कृतिक कार्य विभागाला देण्यासाठी जमीन जिल्हाधिकारी नाशिक यांनी महसूल विभागाला प्रस्ताव पाठवलेला आहे.
पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले, गोरेगाव चित्रनगरीच्या धर्तीवर नाशिक चित्रनगरी उभारण्यासाठी हा प्रकल्प आर्थिक दृष्ट्या व्यवहार्य व सुसाध्य आहे किंवा नाही याची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे काम दादासाहेब फाळके चित्रनगरी महामंडळामार्फत मिटकॉन या संस्थेला देण्यात आलेले होते. मिटकॉन या संस्थेने व्यवहार्यता अहवाल तयार करून महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाला सादर केलेला आहे. महामंडळाने या व्यवहार्यता अहवालाचे विश्लेषण व तपासणी करून हा अहवाल शासनास सादर केलेला आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्देश दिले की, प्राप्त अहवालाचे विश्लेषण करून या प्रकल्पाचा फायनान्शियल वायबिलिटी व गॅप ऍनालिसीस करण्यासाठी के.पी.एम.जी या तज्ञ सल्लागाराची नेमणूक करण्यात आलेली आहे. या सल्लागार संस्थेने नोव्हेंबर अखेरपर्यंत आपला अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. ही जागा सांस्कृतिक कार्य विभागाला देणे बाबत अजित पवार यांनी बैठकीमध्ये आदेश दिले.
या बैठकीत बोलताना सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री आशिष शेलार म्हणाले की, नाशिक येथे चित्रनगरी व्हावी या मताचे आमचा विभाग आहे. या चित्रनगरीसाठी प्रकल्प व्यवस्थापक सल्लागाराची नेमणूक करण्याचे निर्देश देखील सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री आशिष शेलार यांनी दिले. या ठिकाणी चित्रनगरी सोबतच अम्युझनेंट पार्क करण्यात यावा अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केली.
या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री आशिष शेलार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव सौरभ विजय, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, महाराष्ट्र चित्रपट महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे नाशिक समिती प्रमुख शाम लोंढे, दिग्दर्शक राजू फिरके, लाईन प्रोड्युसर अमित कुलकर्णी, कला दिग्दर्शक प्रसाद राहणे आणि फिल्म निर्माता अंबादास खैरे आदी उपस्थित होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.