
मुंबईनाक्यावरील भाभानगरला 16 जुलै 2000 रोजी उभारण्यात आलेल्या 10 लक्ष लिटर क्षमतेच्या जलकुंभातून वितरीत होणाऱ्या पाण्याच्या वाहिन्यांना, व्हॉल्व्हला मोठ्या प्रमाणात गळती लागलेली आहे. त्यामुळे जलकुंभाच्या खालीच अत्यंत गलिच्छ असे डबके साचले आहे. त्याच घाण पाण्यता व्हॉल्व्ह असून, तोच सोडल्यानंतरच परिसरातील 10 हजार नागरिकांना पाणीपुरवठा होतो. अत्यंत दूषित पाणी पोहोचत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो आहे. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. जलकुंभाजवळ पिण्याचे पाणी सोडण्यासाठी आठ ठिकाणी व्हॉल्व्ह आहेत. शेजारीच महिला रुग्णालयाचे काम सुरू असून, तेथेही पाण्याच्या तळ्याखाली मोठा व्हॉल्व्ह गेलेला आहे. जलकुंभाच्या वाहिन्या व व्हॉल्व्हच्या गळतीमुळेच तेथे तळे साचले आहे. या साचलेल्या पाण्यात मद्याच्या रिकाम्या बाटल्या, चपला, जुने कपडे, प्लास्टिक आणि सडलेल्या झाडांच्या फांद्यांचा खच पडला आहे. हेच दुर्गंधीयुक्त पाणी जलवाहिन्यांच्या माध्यमातून नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचत आहे. आजार वाढले या पाण्यामुळे कॉलरा, टायफॉइड आणि गॅस्ट्रोसारख्या जलजन्य आजार जडण्याची भीती वाढलेली असतानाही महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग या गंभीर प्रकाराबाबत पूर्णपणे ‘अनभिज्ञ’ असल्याचे दिसून आले. अधिकाऱ्यांना पाणी पाजणार अधिकारी अद्यापही प्रशासकीय राजवटीतून बाहेर पडलेले नाहीत. महापालिकेने तातडीने या ठिकाणची स्वच्छता करून व्हॉल्व्ह दुरुस्त करावेत अन्यथा त्यांना तेच पाणी पाजणार. – सीमा पवार, नगरसेविका थेट प्रश्न रवींद्र धारणकर, अधीक्षक अभियंता, मनपा Q : व्हॉल्व्हमधून गळती होते
A- व्हॉल्व्हच्या वाहिन्यांना मोठा प्रेशर असतो. त्यामुळे तेथे पाणी गळती होतेच आणि पाणी बाहेर साचते.
Q : पण भाभानगरच्या जलकुंभाखाली डबकं झालंय
A- व्हॉल्व्हमधून बाहेर आलेले पाणी पुन्हा जलवाहिन्यांमध्ये जात नाही. साचलेले पाणी स्वच्छच असते.
Q : दूषित पाणी पुरवठा होतोय?
A- तशा तक्रारी आलेल्या नाहीत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



