digital products downloads

ना PM, ना रेल्वेमंत्री, ना CM… ‘या’ व्यक्तीचं ऐकून ‘मरे’ चालवणार CSMT-खोपोली 15 डबा लोकल; प्लॅन जाहीर

ना PM, ना रेल्वेमंत्री, ना CM… ‘या’ व्यक्तीचं ऐकून ‘मरे’ चालवणार CSMT-खोपोली 15 डबा लोकल; प्लॅन जाहीर

Mumbai Local Train News: मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच सीएसएमटीपासून खोपोलीपर्यंत 15 डब्यांच्या सेवा वाढविण्याची तयारी केली आहे. त्यानुसार ऑगस्ट अखेरपर्यंत सीएसएमटी-कल्याण दरम्यान धीम्या आणि जलद मार्गावरच्या 10 स्टेशनवरील 26 प्लॅटफॉर्म आणि कल्याण ते कसारा आणि खोपोली मार्गावरील 24 स्टेशनच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्यात येणार आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी 31 ऑगस्ट ही इंटरनल डेडलाइन निश्चित केल्याचं सांगितलं जात आहे. मात्र पावसाळ्यामुळे या नियोजनामध्ये थोडा उशीर होण्याची शक्यता रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

किती स्थानकांवर केलं जात आहे काम?

सीएसएमटी-कल्याण दरम्यान जलद मार्गावरील पाच स्थानके, ठाणे-कल्याण दरम्यान धिम्या मार्गावरील आठ स्थानके आणि कल्याण-कसारा/खोपोलीवरील स्थानकांवर 15 डब्यांच्या लोकलसाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करण्यात येणार आहे, तर ठाणे आणि कल्याण दरम्यानच्या ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, कोपर, ठाकुर्ली आणि कल्याण या धिम्या मार्गावरील स्टेशनवरील प्लॅटफॉर्म 15 डब्यांच्या गाड्या थांबविण्यासाठी सज्ज केली जातील, ज्यामुळे वाहतूक क्षमता 25 टक्क्यांनी वाढणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दिवा स्थानकाचा अडथळा

दिवा हे सर्वाधिक वर्दळीचे स्थानक असून, येथे असलेल्या लेव्हल क्रॉसिंग गेटमुळे दररोज सरासरी 32 वेळा फाटक उघडले जाते. त्यामुळे 894 रेल्वे सेवांपैकी 70 ते 75 टक्के स्थानिक सेवांवर परिणाम होतो. पादचारी पुलाचे गर्डर 3 उभारले असले तरी जमीन अधिग्रहण पूर्ण न झाल्याने काम रखडले आहे.

ही कामंही करावी लागणार

15 डब्यांच्या लोकल चालवण्यासाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासोबत इतर कामही करावी लागणार आहेत. ही कामं कोणती ते पाहूयात…

> या प्रकल्पांतर्गत ओव्हरहेड वायर (ओ एच इ) स्थलांतर करणे

> सिग्नल पोल हलवणे,

> ट्रॅक बदल आणि आवश्यक जागा निर्मितीची कामे प्राधान्याने करण्यात येत आहेत.

> मुंब्रा आणि विक्रोळी येथे ओएचई कामांसाठी प्रत्येकी 75 ते 80 लाखांचा खर्च अपेक्षित आहे.

सध्या कोणत्या स्थानकांवर थांबतात 15 डब्यांच्या लोकल?

सीएसएमटी, भायखळा, बाबर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, मुलुंड, ठाणे, डोंबिवली आणि कल्याण या स्थानकांवर थांबतात.

आता या स्थानकात थांबणार 15 डब्यांच्या लोकल

धिम्या मार्ग : शहाड, आंबिवली, टिटवाळा, खडवली, वासिद, आसनगाव, आटगाव, खर्डी, उंबरमाळी, कसारा, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, वांगणी, शेलू, भिवपुरी, कर्जत, पळसदरी, डोलावली, लवजी, खोपोली. जलद मार्ग : विक्रोळी, कळवा, मुंब्रा, दिवा.

कोणाच्या आदेशाने फिरली चक्रं?

दोन महिन्यांपूर्वी मुंब्रा येथील दुर्घटनेनंतर लोकलमधील प्रवासी क्षमता वाढविण्यावर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या आठवड्यात, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सीईओ सतीश कुमार हे मुंबई दौऱ्यावर होते. त्यांनी सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास सुनिश्चित करण्यासाठी 15 डब्यांच्या सेवा वाढविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार 15 डब्यांच्या लोकलसाठी आवश्यक असणारी कामं पूर्ण करण्यास प्राधान्य क्रम दिला जात आहे.

सध्या ट्रेनच्या एकूण किती फेऱ्या मध्य रेल्वेच्या मार्गावर होतात

12 डब्यांच्या फेऱ्या – 1788
15 डब्यांच्या फेऱ्या – 22
एकूण फेन्या – 1810 

FAQ

1. प्लॅटफॉर्म लांबी वाढवण्यासाठी अंतिम मुदत काय आहे?
मध्य रेल्वेने 31 ऑगस्ट 2025 ही अंतिम मुदत (इंटरनल डेडलाइन) निश्चित केली आहे, परंतु पावसाळ्यामुळे यात काही उशीर होण्याची शक्यता आहे.

2. या प्रकल्पामुळे वाहतूक क्षमतेत किती वाढ होईल?
15 डब्यांच्या लोकलमुळे वाहतूक क्षमता 25 टक्क्यांनी वाढेल, ज्यामुळे प्रवाशांची गर्दी कमी होण्यास मदत होईल.

3. सध्या 15 डब्यांच्या लोकल कोणत्या स्थानकांवर थांबतात?
सध्या 15 डब्यांच्या लोकल सीएसएमटी, भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, मुलुंड, ठाणे, डोंबिवली आणि कल्याण या स्थानकांवर थांबतात.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp