
Big Shock To Raj Thackeray After BMC Result: मुंबई महानगरपालिकेच्या निकालामध्ये राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत लढूनही मनसेला दोन आकडी नगरसेवक महापालिकेत निवडून पाठवता आलेले नाहीत. असं असतानाच आता हा निकाल कमी म्हणून की काय राज ठाकरेंना अजून काही धक्के बसतील असं भाकित राज यांच्याच एका निकटवर्तीयाने व्यक्त केलं आहे. विशेष म्हणजे राज यांचे निकटवर्तीय संदीप देशपांडेचं नाव घेऊन हे भाकित व्यक्त करण्यात आलं आहे. नेमकं कोण आणि काय म्हटलंय हे पाहूयात…
राज ठाकरेंना आणखी धक्के बसणार?
मनसेमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असून जागावाटपामध्ये ज्या जागा मिळाल्या होत्या त्या पाहता पक्ष दोन आकड्यांमधील विजयी जागांपर्यंत जाणार नाही हे स्वाभाविक होतं असं मत ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंची साथ सोडून भारतीय जनता पार्टीसोबत गेलेल्या संतोष धुरी यांनी ‘झी 24 तास’ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. यावरुनच संदर्भ देत, “मनसेमधून अजूनही नाराजी उफाळून वर येत आहे. तुमच्या प्रवेशानंतर अजूनही काही प्रवेश झाले. येत्या काळात मनसेला अजूनही काही धक्के बसतील असं वाटतंय?” असा सवाल धुरींना विचारण्यात आला.
या भीतीने लोक थांबलेले, पण…
या प्रश्नाला उत्तर देताना, “नक्कीच मला असं वाटतंय. मी त्यावेळीच विधान केलेलं. तेव्हा निकाल लागला नव्हता. खूप लोकांना वाटत होतं निकाल चांगला लागले. आपण गेल्यानंतर पक्षाला काही नुकसान होईल आणि आपल्यावर ठपका ठेवला जाईल असं खूप लोकांना वाटत होतं. गद्दर आहे, याला काही कमी दिलं का पक्षाने असं बोललं जातं. या भीतीने लोक थांबली होती. आता निकाल लागल्यावर तुम्ही बघालच. गळती लागते. हे सूचक विधान वगैरे नाही हे विधी लिखीत आहे. ते होणारच,” असं धुरी म्हणाले.
संदीप देशपांडेचा पुढचा प्रवास कसा असेल?
संदीप देशपांडेंबद्दल सातत्याने चर्चा होते की ते नाराज आहेत. तुम्ही देखील म्हणाला होतात की त्यांचं मन मोठं आहे. ते दुखावले गेले आहेत. त्यांचा पुढचा प्रवास कसा असेल? ते तुमचे मित्र आहेत. तुम्ही सातत्याने भेटता. आज सकाळी देखील तुम्ही चर्चा केली. तर त्यांच्याबद्दल काय वाटतं? त्यांच्या देखील भाजपा प्रवेशाची चर्चा सुरु आहे, असं म्हणत धुरी यांना पुढला प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना धुरींना सध्या तरी मनसेमध्ये थांबण्याचा निर्णय संदीप यांचा स्वत:चा असल्याचं म्हटलं आहे.
“चर्चेत राहायला आजूबाजूचे कोण ना कोण तरी प्रयत्न करतात. एखाद्याला त्याला पक्षातून घालवायचं असेल तर ते असे कुठेतरी नाक्यावर जाऊन बोलणार किंवा कुठेतरी खासगीमध्ये कोणाशी तरी बोलणार. तो 10 लोकांना आणि ते 10 लोक 100 लोकांना कळवणार. त्याप्रमाणे त्याने कळवलं असेल. त्यांना जायचं असतं तर तेव्हाच आम्ही एकत्र निघालो असतो. त्यांना जायचं नव्हतं म्हणून तर ते थांबले ना?” असा प्रतिप्रश्न धुरी यांनी उत्तरामध्ये विचारला.
संदीप देशपांडे मनसेमध्ये कायम राहतील?
संदीप देशपांडे मनसेमध्ये कायम राहतील? भाजपा प्रवेश होईल असं वाटत नाही? असा प्रश्न विचारण्यात आला असता धुरींनी, “ते राहतील का नाही माहिती नाही पण राज साहेब नक्कीच त्यांना थांबवतील,” असं उत्तर दिलं.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



