
Nilesh Rane And Nitesh Rane : महाराष्ट्राच्या राजकारण सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे महाविकास आघाडी आणि महायुतीमधील अनेक नेते आक्रमक होताना दिसत आहेत. ज्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामधील नेत्यांमध्ये बाचाबाची आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी बघायला मिळत आहेत.
दरम्यान, अशातच सतत आपल्या हटके आणि आक्रमक भूमिकेमुळे चर्चेत असणारे राणे कुटुंब हे देखील चर्चेत आलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात आता महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील समोर आल्या आहेत. अशातच शिवसेना शिंदे गटात सामील झालेल्या निलेश राणे यांनी आपल्या बंधू भाजप नेते आणि मंत्री निलेश राणेंना एक सल्ला दिला आहे.
नितेश राणे यांचं वक्तव्य
आगामी निवडणुकांमुळे अनेक नेते भाषणांमध्ये आक्रमक होताना दिसत आहेत. अशातच नितेश राणे यांचं वक्तव्य चर्चेत आलं आहे. सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री राज्यात बसला आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवा. त्यामुळे कोणी कितीही ताकद दाखवली किंवा कोणीही कसेही नाचले तरी देशात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान आणि राज्यात देवेंद्र फडणवीस हेच खरे मुख्यमंत्री आहेत असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं. या वक्तव्यानंतर नितेश राणेंचं मोठे बंधू निलेश राणे यांनी बंधू नितेश राणेंना एक्सवर ट्विट करत एक सल्ला दिला आहे.
‘नितेशने जपून बोलावे, बोलताना भान ठेवायला हवे’
नितेश ने जपून बोलावे. मी भेटल्यावर बोलेननच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे. सभेत बोलणं सोपं आहे पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही. असा सल्ला निलेश राणेंनी नितेश राणेंना दिला आहे. तर यावर नितेश राणे यांनी निलेशजी तुम्ही tax free आहात असं मिश्किल उत्तर निलेश राणेंना एक्सवर ट्विट करत दिलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.