
Shahaji Bapu Patil: महायुतीच्या नेत्यांमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर येऊ लागलाय. याला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत वर्चस्व कायम ठेवण्याचा भाजपचा हट्ट हे निमित्त ठरलंय. सोलापूर जिल्ह्यातील 11 नगरपालिका आणि 1 नगरपंचायतीमध्ये भाजपने मित्रपक्षांच्या ताकदीकडे दुर्लक्ष करून सर्व ठिकाणी आपले उमेदवार दिलेत.सांगोला नगरपालिका निवडणुकीत नैसर्गिक मित्र शिवसेना असतानाही भाजपने शेकापचे आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या सोबत युती केली. हे सगळं करताना शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांना कुठलंही महत्त्व दिलं नाही. त्यामुळे शहाजीबापू नाराज आहेत. काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घेऊया.
या राजकारणात एकटे पाडल्याची भावना निर्माण झालेल्या शहाजीबापूंनीही 23 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष स्वतंत्र शिवसेना चिन्हावर लढवण्याचा निर्णय घेतला. यानंतर शहाजीबापूंनी एक एक गुपिते जाहीरपणे सांगण्यास सुरुवात केली. विधानसभा निवडणुकीत आपल्याविरोधात मंत्री जयकुमार गोरेंनी शेकाप उमेदवाराला पैसा पुरवला असा आरोप शहाजीबापूंनी केलाय. याबाबत निवडणुकीआधीच माहिती असूनही भाजपवर टीका केली नाही याची आठवणही करुन दिली.
सांगोल्यात एकटं पडलेल्या शहाजीबापूंसाठी उपमुख्यमंत्री शिंदेही मैदानात उतरले. सांगोल्यातील सभेत जखमी शेर, ऑलराऊंडर, धोनी, सचिन अशी विशेषणं वापरत शिंदेंनी शहाजीबापूंचं कौतुक केलं.
उपमुख्यमंत्री शिंदेंनी मित्रपक्ष भाजपला लोकसभेला केलेल्या मदतीची आठवण करुन दिली. तसंच शहाजीबापूंच्या पाठिशी ठामपणे असल्याचंही जाहीररित्या सांगितलं.. तर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा चांगल्या पद्धतीने निवडणूक लढू असा सल्ला महसूलमंत्री बावनकुळेंनी दिलाय.
काही दिवसांपूर्वी मित्रपक्षातील ऑपरेशन लोटसमुळे उपमुख्यमंत्री शिंदेंनी थेट अमित शाहांकडे नाराजी व्यक्त केली होती.. आता नगरपालिका निवडणुका प्रचाराच्या निमित्ताने सांगोल्यातून शहाजी बापू पाटील यांनी मित्रपक्ष भाजपविरोधात मनातील खदखद व्यक्त केलीय. त्यामुळे आगामी काळात शहाजीबापूंच्या या ‘ठिणगी’मुळे महायुतीत ‘वणवा’ तर पेटणार नाही ना याबाबत उलटसुलट चर्चा रंगल्यात.
FAQ
प्रश्न: महायुतीमध्ये कलहाचे मुख्य कारण काय आहे?
उत्तर: महायुतीमध्ये कलहाचे मुख्य कारण सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा वर्चस्वाचा हट्ट आहे. भाजपने ११ नगरपालिका आणि १ नगरपंचायतीत मित्रपक्ष शिवसेनेच्या ताकदीकडे दुर्लक्ष करून सर्वत्र स्वतःचे उमेदवार उभे केले. सांगोला निवडणुकीत शिवसेनेऐवजी शेकापच्या आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याशी युती केल्याने शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील एकटे पडले आणि त्यांनी स्वतंत्रपणे २३ नगरसेवक व एक नगराध्यक्ष शिवसेना चिन्हावर लढवण्याचा निर्णय घेतला.
प्रश्न: शहाजीबापू पाटील यांनी भाजपवर कोणते आरोप केले?
उत्तर: शहाजीबापूंनी आरोप केला की, विधानसभा निवडणुकीत मंत्री जयकुमार गोरे यांनी शेकाप उमेदवाराला पैसा पुरवला. ही माहिती निवडणुकीआधीच माहीत असूनही त्यांनी भाजपवर टीका केली नाही, कारण महायुती एकत्र लढत होती. आता सांगोल्यात एकटे पडल्याने त्यांनी हे गुपिते जाहीरपणे सांगण्यास सुरुवात केली आणि भाजपविरोधात मनातील खदखद व्यक्त केली.
प्रश्न: या कलहावर उपमुख्यमंत्री शिंदे आणि इतर नेत्यांची प्रतिक्रिया काय आहे?
उत्तर: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगोल्यातील सभेत शहाजीबापूंच्या पाठीशी ठाम उभे राहिले आणि त्यांचे ‘जखमी शेर, ऑलराऊंडर, धोनी, सचिन’ असे कौतुक केले. शिंदेंनी भाजपला लोकसभा निवडणुकीत केलेल्या मदतीची आठवण करून दिली. दुसरीकडे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आरोप-प्रत्यारोप टाळून चांगल्या पद्धतीने निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला. शिंदेंनी यापूर्वी ऑपरेशन लोटसमुळे अमित शाहांकडे नाराजीही व्यक्त केली होती.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



