
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी लिहिलेल्या लेखातून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर टीका केली आहे. तसेच निवडणूक आयोगाला काही प्रश्न सुद्धा विचारले होते. त्यांच्या लेखाला प्रत्युत्तर म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील लेख लिहीत प्रत्युत्
.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, राहुल गांधी यांनी काल काही प्रश्न उपस्थित केले होते, भाजपवर त्यात थेट आरोप नव्हता. लोकशाही वाचण्याच्या दृष्टीने वस्तुनिष्ठ प्रश्न उपस्थित केले. निवडणूक झाल्यापासून राहुल गांधी सदर मुद्द्याचा पाठपुरावा करत आहेत. निवडणूक आयोगाने यावर उत्तर देणे अपेक्षित आहेत. मात्र, याची उत्तरे देवेंद्र फडणवीस व अमित शाह देत आहेत, असा टोला सपकाळ यांनी लगावला आहे.
पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी आज लेख लिहिला आहे. गोंधळलेल्या परिस्थितीत हा लेख लिहिला आहे. तुम्हीच आरोपी आहात आणि तुम्हीच लेख लिहित आहात. त्यामधे तुमच्यासोबत केंद्रीय यंत्रणा आणि तुमचा पक्ष देखील आहे. रामशास्त्री प्रभुणे यांच्या बाण्यात असल्याचा आविर्भाव आणला. मात्र, त्यांचा कारभार घाशीराम कोतवाल सारखा आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली आहे.
किरण कुलकर्णी या अधिकाऱ्याची नार्को टेस्ट करा
पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले की, किरण कुलकर्णी नावाचे अधिकारी निवडणूक आयोगात काम करत होते. एस. चोकलिंगम यांच्यानंतर ते काम करत होते. वाढलेल्या मतदानाबाबत त्यांना सगळी माहिती आहे, निवडणुका संपल्या की मराठी भाषा विभागात त्यांची बदली केली. जेणेकरून कोणतीच बाब उघडकीस येऊ नये, असा गंभीर आरोप देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. तसेच, तत्काळ किरण कुलकर्णी या अधिकाऱ्याची नार्को टेस्ट करा, अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे.
आम्ही 200 मतदारसंघाचा डेटा समोर ठेवला आहे. केवळ ते दोन तीन मतदारसंघाचं उदाहरण देता. मग आमची मागणी आहे, त्यावेळीचे सीसीटीव्ही समोर आणा. त्याठिकाणी असणारे मदरबोर्ड तपासा आणि किरण कुलकर्णी यांची तत्काळ नार्को टेस्ट करा, असेही सपकाळ म्हणाले.
देवेंद्र फडणवीस सतत खोटं बोलणारा माणूस
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, तुम्ही गडचिरोलीला कशाला जातात हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. कारण तिथे खाण आहे, तिथे आर्थिक हित जपण्यासाठी तुम्ही जातात. देवेंद्र फडणवीस सतत खोट बोलणारा माणूस आहे. आधी म्हणाले वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही. मात्र, तसे झाले नाही. दुसरे खोटे राष्ट्रवादी सोबत जाणार नाही नाही नाही, अजित पवार चक्की पिसिंग पिसिंग पिसिंग, मात्र आता त्यांनी मिक्सिंग मिक्सिंग मिक्सिंग केले आहे. ते केवळ क्लीन चीट देण्यात पटाईत आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांच्या विरोधात गंभीर आरोप केले होते. ते कशी लूट करतात हे मांडले होते. पुढे काय झाले त्यांना क्लीन चिट दिली आणि त्यांना सोबत घेतले. त्यानंतर अजित पवारांवर आरोप केले, मात्र त्यांच्यासोबतच ते आहेत. नंतर छगन भुजबळ यांचे देखील उदाहरण आहे. आता लेख लिहून निवडणूक आयोगाला देखील क्लीन चीट दिली आहे. देवेंद्र फडणवीस ज्यांची बाजू घेतात त्यावेळी लक्षात घ्यावे दाल मे कुछ काला है, असे सपकाळ यांनी म्हटले.
पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, अमित शाह यांनी सांगितले त्यामुळे लगेच लेख त्यांनी लिहिला आहे. ते वकील आहेत त्यामुळे आरोपीची बाजू ते चांगली घेतात. रामदास आठवलेच देवेंद्र फडणवीस यांच्या लेखाला चारोळीच्या माध्यमातून उत्तर देतील, असा मिश्कील टोलाही लगावला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.