
वृक्षसंवर्धनासाठी सेवानिवृत्त प्राचार्य एन. डी. दंडगव्हाळ यांनी वृक्षमित्र परिवारास २१ हजार रुपयांची देणगी देत वृक्षसंवर्धनाच्या कार्यास पाठबळ दिले आहे.
.
नूतन जवाहर विद्यालयात आरकॉन ग्रुप व वृक्षमित्र परिवाराला गुणवंत पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी दंडगव्हाळ यांना गुरुवंदन पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमानिमित्ताने त्यांनी वृक्षमित्र परिवाराच्या कार्याची माहिती जाणून घेतली होती. वृक्षमित्र परिवाराने तीन वर्षापासून पाच हजाराहून अधिक झाडांची लागवड केली आहे. वृक्षलागवड व संवर्धनासाठी विविध उपक्रम हाती घेत गावातील महिला, तरुण, ज्येष्ठांनाही सहभागी करून घेत वृक्ष लागवड चळवळ मोठ्या प्रमाणावर उभी केली आहे. पर्यावरण संतुलनासाठी मोठे काम वृक्ष मित्रपरिवार करत आहे. प्लास्टिकमुक्त गाव संकल्पना तसेच पर्यावरणपूरक गणेश विसर्जन उपक्रम या परिवाराने लोकसहभागातून राबवलेले आहे. या सर्व कार्याचा विचार करता दंडगव्हाळ यांनी परिवाराचे कार्य चालू राहावे यासाठी प्रोत्साहनपर २१ हजार रुपयांची देणगी वृक्ष मित्र परिवाराचे अध्यक्ष रत्नाकर सोनवणे, सचिव सुरेश कपिल, रमण शिंदे, दत्तात्रय गायकवाड, नितिन शिंदे यांच्याकडे सुपूर्द केली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.