
BJP aspirants for Rajya Sabha: राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यामधील महाराष्ट्रातील 7 जागांचा समावेश आहे. यानंतर सर्व पक्षांकडून इच्छुकांची गर्दी होऊ लागली आहे. भाजपातही अनेक इच्छुकांनी आपल्याला संधी मिळावी यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. निष्ठावंतांना न्याय द्यावा अशी मागणी भाजपातील जुने नेते करत आहेत. ऐनवेळी पक्षात आलेल्यांना संधी न देता, निष्ठावंतांना न्याय दिला जावा असं त्यांचं म्हणणं आहे.
राज्यसभेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची फिल्डिंग
ऐनवेळी पक्षात आलेल्यांना संधी न देता निष्ठवंतांना न्याय द्या अशी भाजपातील जुन्या नेत्यांची आग्रही मागणी आहे. भाजपमध्ये काही प्रमुख नावांची राज्यसभेसाठी चर्चा आहे. यामध्ये विनोद तावडे, रामदास आठवले, विजया रहाटकर, भागवत कराड, धैर्यशील पाटील यांचा समावेश आहे.
नाराजांना शांत करण्यासाठी महायुतीचे प्रयत्न
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर आता राज्यसभा आणि परिषदेच्या जागा भरल्या जाणार आहेत. राज्यसभेच्या 7 तर विधानपरिषदेच्या 9 जागा रिक्त होणार आहेत. राज्यपाल नियुक्त 5 जागांवरही लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्यसभा आणि परिषदेवर इच्छूकांपैकी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष आहे.
रिक्त जागांपैकी अधिक जागा महायुतीच्या पारड्यात पडणार आहेत. तर संख्याबळाचा सर्वाधिक फटका महाविकास आघाडीला बसणार आहे. स्थानिक निवडणुकांमधील निराशाजनक कामगिरीमुळे विधान परिषदेच्या जागांवर परिणाम होणार आहे.
असा असेल राज्यसभा निवडणुकीचा कार्यक्रम
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, या निवडणुकांसाठी उमेदवारांना 26 फेब्रुवारी पासून अर्ज भरता येणार आहेत. तसेच 5 मार्च ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख असेल. त्यानंतर 6 मार्च रोजी या अर्जांची छाननी केली जाईल. उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी 9 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तर मतदान प्रक्रिया 16 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंतच्या वेळेत पार पडणार आहे. त्याचदिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणीची प्रक्रिया सुरू केली जाईल.
भाजपकडून राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता
दरम्यान, महाराष्ट्र राज्यसभेच्या जागांसाठीचे समीकरण विधानसभेतील पक्षीय बलाबलानुसार ठरते. सध्याच्या समीकरणानुसार भाजपचा वरचष्मा असून महायुतीला 6 जागांपैकी जास्तीत जास्त जागा मिळवण्याची संधी आहे, तर मविआला एक किंवा दोन जागा मिळवणे आव्हानात्मक आहे. मात्र महायुतीला मिळालेल्या 6 जागांचे वाटप भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या तिन्ही पक्षांमध्ये कसे होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच भाजपकडून अधिकचा उमेदवार न दिल्यास राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



