
Chandrpur Doctor Suicide: चंद्रपूरच्या नवरगावातील हा अनुराग बोरकर. नीट यूजी 2025च्या परीक्षेत त्यानं 99.99 टक्के गुण मिळवले.. ओबीसी प्रवर्गातून त्यानं 1 हजार 475 वी रँक पटकावली होती. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक झालं.
अनुरागला उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस प्रथम वर्षाला प्रवेश मिळाला होता आणि याच प्रवेशासाठी तो 23 सप्टेंबरला पहाटे गोरखपूरला जाणार होता. मुलगा डॉक्टर होऊन घरी येणार म्हणून त्याचे आई-वडील सुखात झोपले. मात्र प्रवेशाला जाण्यापूर्वी अनुरागनं टोकाचं पाऊल उचललं आणि गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. जगाचा निरोप घेण्यापूर्वी त्यानं सूसाईड नोट लिहिली आणि त्यात मला डॉक्टर व्हायचं नाही असं नमूद केलं.
अनुरागचं दहावीपर्यंतचं शिक्षण सिंदेवाही येथील देवयानी इंटरनॅशनल स्कूलमधून झाले होतं. बारावीचे शिक्षण त्याने नागपूरच्या सेंट पॉल ज्युनियर कॉलेजमधून पूर्ण केलं होतं. तो हुशार आणि मेहनती विद्यार्थी म्हणून तो ओळखला जायचा.
कठोर परिश्रमातून त्यानं नीट परीक्षेत यश मिळवलं होतं. मात्र अभ्यासाचा दबाव आणि भीती यामुळे त्यानं जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. एका यशस्वी विद्यार्थ्यानं एकाएकी असं टोकाचं पाऊल उचलल्याने मुलांवरील शिक्षण आणि करिअरच्या दबावाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय.
अनुरागचे कुटुंब सधन आहे. त्याच्या वडिलांचे कृषी केंद्र आहे. त्यांचे इतरही व्यवसाय आहेत. वडील स्थानिक व्यापारी संघटनेचे प्रमुख देखील आहेत. कुटुंबात शिक्षणाचे वातावरण आहे. त्याची धाकटी बहीण जेईईची तयारी करत आहे. त्याने तालुक्यातील सर्वोत्तम शाळेत नर्सरी ते दहावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर, त्याने अकरावी, बारावी आणि नीटसाठी नागपूरमधील एका महाविद्यालयाची निवड केली. अनुरागला त्याच्या दोन प्रयत्नांमध्ये अपेक्षित निकाल मिळाले नाहीत. तिसऱ्या वेळी, त्याने कठोर परिश्रम केले आणि नीटचा किल्ला सर केला. अनुरागचे दहावीचे शिक्षक त्याची अभ्यासू वृत्ती आणि मनमिळावू स्वभाव विसरू शकत नाहीयेत
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



