
भाजप आमदार तथा मंत्री नीतेश राणे यांनी मनसेवर टीका करत मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची घोषणा करणाऱ्या काँग्रेसला खोचक टोला हाणला आहे. काँग्रेस व मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागलेत. त्यामुळे आपण लांबूनच हसलेले बरे, असे ते म्हणालेत. काँग्रेसची बीएमस
.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी आज मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली. यामुळे विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीत उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनीही या प्रकरणी मनसेला सोबत घेण्यावर तीव्र आगपाखड केली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री नीतेश राणे यांनी काँग्रेस व मनसेला वरील टोला हाणला आहे.
काँग्रेसची भाषा ही जिहाद्यांची
नीतेश राणे म्हणाले, काँग्रेसमध्ये खरेच हिंमत असेल तर त्यांनी मुंबईत स्वबळावर निवडणूक लढवून दाखवावे. ते नुसत्या सुक्या धमक्या देतात. विजय वडेट्टीवार एक बोलणार, वर्षा गायकवाड दुसरे बोलणार आणि तिकडे अस्लम शेख वेगळेच बोलणार. हा सर्व मुंबईवर हिरव्यांचे राज्य आणण्याचा कार्यक्रम आहे. काँग्रेसची भाषा ही जिहाद्यांची भाषा आहे. त्यामुळे तिच्यावर मुंबई व महाराष्ट्रच नव्हे तर देशातही कुणाचा विश्वास राहिला नाही.
राहुल गांधी हे पूर्णवेळ नव्हे तर अर्धवेळ राजकारणी
नीतेश राणे यांनी यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी अर्धवेळ राजकारणी असल्याचीही टीका केली. राहुल गांधी हे अर्धवेळ राजकारणी आहेत. त्यांची जनतेशी नाळ नाही. ते देशासाठी पर्यटक आहेत. ते देशाची बदनामी करतात आणि पुन्हा परदेशात जातात. त्यामुळे त्यांना 100 टक्के भारतीय म्हणायचे का? हा प्रश्न उपस्थित होतो. अशा लोकांना बिहारच्या जनतेने नाकारले आहे. एकीकडे मतचोरीची बोंब करायची व दुसरीकडे लोकशाहीची थट्टा उडवायची ही राहुल गांधींना सवय झाली आहे. यामुळेच बिहारच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या एनडीएला बिहारचे नेतृत्व करण्याची पुन्हा संधी दिली, असे ते म्हणाले.
काय म्हणाल्या होत्या वर्षा गायकवाड?
उल्लेखनीय बाब म्हणजे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचे सूतोवाच करताना मनसेवर निशाणा साधला होता. त्या म्हणाल्या होत्या, आम्ही देशाचे संविधान मानणारी मंडळी आहोत. आम्ही सर्वांना सोबत घेऊन जाणारे लोक आहोत. मुंबईच्या बाबतीत बोलायचे झाले तर आम्ही सातत्याने मुंबईच्या विकासावर बोलतो. आम्ही रोज मुंबईकरांचा त्रास पाहत आहोत. या प्रकरणी सर्वांनी एकत्र येऊन बोलण्याची गरज होती. कारण, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. पण काही पक्षांच्या माध्यमातून सातत्याने जी मारहाण केली जाते किंवा कायदा सुव्यवस्था हातात घेतली जाते. विशेषतः त्यांच्याकडून जी भाषा वापरली जाते, ती भाषा आमच्या सुसंस्कृतपणाला शोभणारी भाषा नाही.
महाविकास आघाडीमध्ये आम्ही किमान समान कार्यक्रमावर चालण्याचा प्रयत्न केला. हा कार्यक्रम सर्वांसाठी असला पाहिजे. संविधानाच्या धाग्यातून असला पाहिजे. परंतु काही पक्षांची भूमिका ही मारहाणीची राहिली आहे. लोकांना त्रास देण्याची राहिली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही. उद्धव ठाकरे यांचा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांनी त्यांचा योग्य तो निर्णय घ्यावा. पण सध्या ते ज्या लोकांशी चर्चा करत आहेत, त्यांच्याशी आमचे कितपत जमेल हे आम्हाला माहिती नाही.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



