
राज्यात महिलांवरील अत्याचाराचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथील ॲसिड हल्ल्याची घटना ताजी असतानाच, आता विठ्ठलाच्या पावन नगरीत म्हणजे पंढरपुरात एका तरुणीवर ॲसिड हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वैष्णवी भागवत अस
.
प्राथमिक माहितीनुसार, वैष्णवी आपल्या कामावरून जात असताना एका अज्ञात इसमाने तिच्यावर अचानक ॲसिड फेकून पळ काढला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे वैष्णवी गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने शहरातील ‘लाईफलाईन’ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.
मुलीच्या आईचे कळकळीचे आवाहन
रुग्णालयाबाहेर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. वैष्णवीच्या आईने रडत रडत प्रतिक्रिया देताना सांगितले की, “आम्हाला फोन आला तेव्हा आम्ही पेट्रोल पंपाजवळ पोहोचलो, तिथे माझ्या लेकीवर ॲसिड टाकल्याचे समजले. जे माझ्या मुलीसोबत घडले, तसे कुणासोबतही घडू नका, असे आवाहन वैष्णवीच्या आईने केले. तसेच सरकारने या नराधमांना कठोर शासन करावे,” अशी मागणी पीडित कुटुंबाच्या वतीने करण्यात आली.
पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू
पंढरपूर शहर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे शहरात आधीच मोठा फौजफाटा तैनात असतानाही हा हल्ला कसा झाला? आरोपीला कोणाचे पाठबळ आहे का? या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत. या घटनेमुळे पंढरपुरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यात दहशतीचे वातावरण
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशोक खरात प्रकरणामुळे आधीच जनमानसात संतापाची लाट आहे. शिर्डी येथील ॲसिड हल्ल्यातील आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. आता पंढरपुरातही तसाच प्रकार घडल्याने गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला आहे का? असा सवाल विचारला जात आहे.
हे ही वाचा…
साताऱ्यात भटक्या कुत्र्याची दहशत!:जकातवाडीत एकाच दिवशी 11 जणांवर हल्ला; दोन चिमुरड्यांसह अनेकजण गंभीर जखमी
सातारा तालुक्यातील जकातवाडी परिसरात रविवारी भटक्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यामुळे एकाच दिवशी ११ जण जखमी झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. जखमींमध्ये दोन लहान मुलींचा समावेश असून काहींना गंभीर दुखापती झाल्या आहेत. सविस्तर वाचा…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






