
Pune Crime News: दौंड तालुक्यात धक्कादायक घटना घडली असून आषाढी वारी निमित्त दर्शनासाठी पंढरपूरला निघालेल्या चारचाकीमधील अल्पवयीन मुलीच्या गळ्याला कोयता लावून दोन तरुणांनी अत्याचार केला. त्याचबरोबर मुली सोबत असणाऱ्या महिलांच्या डोळ्यात मिरचीची पावडर टाकून दीड लाख रुपयांचे दागिने लुटल्याची घटना समोर आले आहे.
दरम्यान, पुणे- सोलापूर महामार्गहून जात असताना दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली या गावाजवळ पहाटेच्या दरम्यान ड्रायव्हर चहा पिण्यासाठी थांबलेला असताना दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी कोयत्याचा धाक दाखवून पंढरपूरला जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीच्या गळ्याला कोयता लावून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना दौंडमध्ये घडली आहे. या प्रकारामुळे पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी दोन तरुणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास काहीजण पुणे-सोलापूर महामार्गावरून चारचाकी वाहनाने पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात होते. त्याचवेळी तिथे दोघेजण दुचाकीवरून आले. चहा पिण्यासाठी ते थांबले होते. त्याच वेळी त्या दोघांनी आपल्या जवळ असणाऱ्या कोयता काढत एका अल्पवयीन मुलीच्या गळ्याला लावला आणि त्या ठिकाणी टपरीच्या शेजारी असणाऱ्या नाल्याच्या शेजारी असणार्या झाडीमध्ये फरपटत घेऊन गेले. तिच्यावर दोघांनी तिथेच अत्याचार केला.
त्यावेळी तिथे असणाऱ्या एका महिलेच्या डोळ्यांमध्ये या दोन तरुणांनी लाल रंगाची चटणी टाकून तिच्या अंगावर असणारे 1 लाख 50 हजार रुपयांचे दागिने घेऊन दोघेही प्रसार झाले. ही संपूर्ण घटना दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून सध्या या प्रकरणी दोन अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौंड पोलीस सध्या या आरोपींचा शोध घेत आहेत अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली आहे.
पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
दौंडमधील या घटनेनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. या घटनेनंतर दौंड तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर महिलांच्या सुरक्षेतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुणे-सोलापूर महामार्ग पहाटे घेडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. वारीमधील महिला सुरक्षित आहेत का? असा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित केला जात आहे. या प्रकरणी सध्या दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.