
ब्युरो रिपोर्ट झी २४तास मुंबई : सरसंघचालक मोहन भागवत यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांचं अभिष्टचिंतन करणारा एक खास लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिला आहे. या लेखामध्ये पंतप्रधान मोदी यांनी मोहन भागवत यांच्या कार्यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांचा वाढदिवस. वाढदिवसाच्या निमित्ताने देशातील अनेक नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यात विशेष उल्लेख होतोय तो पंतप्रधान नरेंद्र मोदींचा. पंतप्रधानांनी सरसंघचालकांना शुभेच्छा देताना एक खास लेखही लिहिला आहे. ज्यात ते म्हणतात. आज एका अशा व्यक्तिमत्त्वाचा वाढदिवस आहे, ज्यांनी वसुधैव कुटुंबकम् या तत्त्वाने प्रेरित होऊन आपले संपूर्ण जीवन सामाजिक परिवर्तन तसेच सलोखा आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्यासाठी समर्पित केले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेले लाखो लोक, त्यांचा परमपूज्य सरसंघचालक असाच आदरभावपूर्ण उल्लेख करतात. होय, मी मोहन भागवत यांच्याबद्दलच बोलतो आहे. महत्त्वाचा योगायोग असा की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपली शताब्दी साजरी करत असलेले वर्ष त्यांच्याही 75व्या वाढदिवसाचे वर्ष आहे. मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी तसेच उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो.
मोहनजी हे 1970 च्या दशकाच्या मध्यात संघाचे प्रचारक बनले. प्रचारक हा शब्द ऐकल्यावर एखाद्याला, कदाचित प्रचारक म्हणजे केवळ प्रचार करणारा किंवा मोहीम चालवणारा, असे वाटू शकते. परंतु जे कोणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीशी परिचित आहेत, त्यांना याची जाणीव आहे की, प्रचारकांची ही परंपरा संघटनेच्या कार्याचा गाभा आहे.
गेल्या शंभर वर्षांत, देशभक्तीच्या भावनेने प्रेरित होऊन हजारो तरुणांनी ‘भारत प्रथम’ हे ध्येय साध्य करण्यासाठी आपले घरदार आणि कुटुंबाचा त्याग करून आपले आयुष्य समर्पित केले आहे. दरम्यान पंतप्रधानांचा लेख केवळ औपचारीकता नाही तर संवेदनशीलतेचं प्रकटीकरण असल्याचं संघ अभ्यासकांनी म्हटलं आहे.
मोहन भागवतांच्या कामाचा सर्व आलेख या लेखात आल्याचं महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत..तर खासदार सुप्रिया सुळेंनीही मोहन भागवतांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 2009पासून मोहन भागवत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक म्हणून संघटनेला मार्गदर्शन करत आहेत.. त्यांचं नेतृत्व आणि मार्गदर्शन लाखो स्वयंसेवकांसाठी सदैव प्रेरणादायी ठरत आहे..
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.